Corona Update | 89 पैकी 2 रुग्ण ICU मध्ये, महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा विचार : राजेश टोपे

| Updated on: Mar 23, 2020 | 11:35 AM

जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे, असेही राजेश टोपे (Health minister Rajesh Tope Corona) म्हणाले. 

Corona Update | 89 पैकी 2 रुग्ण ICU मध्ये, महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा विचार : राजेश टोपे
Follow us on

मुंबई : “राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 14 आणि पुण्यात 1 नवीन रुग्ण आढळला (Health minister Rajesh Tope Corona) आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 89 वर आहे. यातील 8 जण संपर्कात आल्याने बाधा झाली. तर 6 जण बाहेरुन प्रवास करुन आले आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“आज फिलिपिन्समधून आलेल्या ज्या नागरिकाचा मृत्यू (Health minister Rajesh Tope Corona) झाला. तो आधी कस्तुरबामध्ये उपचार घेत होता. त्यानंतर रिलायन्समध्ये उपचार सुरु होते. त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासावा लागेल,” असेही राजेश टोपे म्हणाले.

“जे लोक निगेटिव्ह येतील, त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. हा आजार बरा होतो, आज 89 पेशंट आहेत, त्यापैकी 1 पुण्याचा आणि 1 मुंबईचा आयसीयूमध्ये आहेस,” असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

“लवकरच महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच तूर्तास गोवा बॉर्डर सील केली आहे,” असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

“मीच माझा रक्षक हे महत्त्वाचं आहे. मी स्वत:ची सुरक्षा स्वत: करेन, सुरक्षित अंतर ठेवेन हे महत्त्वाचं आहे,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

जमावबंदीचा आदेश भंग करणाऱ्यावर कारवाई

“मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंटवर पोलीस आयुक्त नजर ठेवून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची गर्दी कमी करा. महाराष्ट्रात 144 कलम लागू असताना अनेक मुंबईकर बाहेर पडत आहे. त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही घरीच थांबा. एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ नका. त्यांच्यावर कारवाई होईल. जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले.

“रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, संसर्ग टाळण्यासाठी घरी राहा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल, “असेही त्यांनी स्पष्ट केले.

“वृद्ध आणि लहान मुलांची जास्तीत जास्त काळजी घ्या. ज्या व्यक्तींना डायबिटीस किंवा अन्य आजार आहेत त्यांनी जास्त दक्षता बाळगा.”

“घाबरु नका पण खबरदारी घ्या. रक्तदान करा विषयी काही करता येईल का?? राजेश टोपे वारंवार ओरडून सांगत आहेत आणि राज्यात दीड-दोन आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा (Health minister Rajesh Tope Corona) आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले.