आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. (Rajesh Tope vehicles blocked in Amravati by BJP Yuva Morcha)
अमरावती : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं. (Rajesh Tope vehicles blocked in Amravati by BJP Yuva Morcha)
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष प्रणित सोनी यांनी दिला.
दरम्यान राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
आज #अमरावती जिल्ह्यातील #COVID19 चा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेजी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/y6puiBUYIc
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 25, 2020
राज्यात काल 17 हजार 794 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे नवीन 19 हजार 592 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9 लाख 92 हजार 806 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 72 हजार 775 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 76.33 टक्के झाले आहे. (Rajesh Tope vehicles blocked in Amravati by BJP Yuva Morcha)
संबंधित बातम्या :
रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे