VIDEO : लॉकडाऊन संपला, पण कोरोना गेलाच नाही, आता काय? चिमुरडीच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांकडून उत्तर
सोशल डिस्टन्स पाळूनच आपल्याला जगावं लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगताना दिसत (Rajesh Tope Video On Maintain Social Distancing) आहे.
मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कोरोनाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आम्हाला जगू देणार की नाही, असंच सामान्य नागरिकांकडून बोललं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात सोशल डिस्टन्स पाळूनच आपल्याला जगावं लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Health Minister Rajesh Tope Video On Maintain Social Distancing Corona Pandemic)
राजेश टोपे यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओत एक शाळकरी मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. त्या चिमुकलीने आरोग्यमंत्र्यांना लॉकडाऊन आणि कोरोनाबद्दल प्रश्न विचारले आहेत.
“सर, लॉकडाऊन तर संपला पण कोरोना गेलाच नाही, आता काय?. चिमुकलीच्या या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले, आता घाबरायचं नाही, लढायचं आणि कोरोनाला पळवून लावायचं, असे राजेश टोपे म्हणाले.”
त्यानतंर त्या चिमुकलीने म्हणजे नेमकं काय करायचं सर असे विचारले. तेव्हा राजेश टोपे म्हणाले, “आता नेहमी आपले हात पाणी आणि साबणाने सतत धुवायचे. शिंका आली तर रुमालाचा वापर करायचा. ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. गर्दीत जाणं टाळायचं, सोशल डिस्टंसिंग पाळायचं.”
“एक नक्की लक्षात ठेवायचं, कोरोना नक्की बरा होतो. फक्त न घाबरता त्याचा सामना करायचा,” असे राजेश टोपे म्हणाले. (Health Minister Rajesh Tope Video On Maintain Social Distancing Corona Pandemic)
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
या व्हिडीओतून आता नियम पाळून आपणाला जगावं लागेल, कोरोनाविरुद्ध लढाई लढावी लागेल. सोशल डिस्टन्स पाळा…..कोरोनाला घाला आळा… असा संदेशच आरोग्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे.
सर्वांना मिळून कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही यात म्हटले आहे.
महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देशात अनलॉक आणि मिशन बिगेन अगेनची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने काही जिल्ह्यांनी पुन्हा एकदा 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अनेक नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्रालयाकडून हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. (Health Minister Rajesh Tope Video On Maintain Social Distancing Corona Pandemic)
सोशल डिस्टन्स पाळा…..कोरोनाला घाला आळा….सर्वांना मिळुन कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषता लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.शाळकरी विद्यार्थींनीशी साधलेला संवाद.. pic.twitter.com/SskVGKSd11
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 13, 2020
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | दिवसभरात 6,497 नव्या रुग्णांची भर, आकडा 2 लाख 60 हजार 924 वर
CORONA | राज्याची परिस्थिती गंभीर होतेय, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र