Doctors Day | धार्मिक स्थळं बंद, देव तुमच्या रुपात, राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, अशा भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या (Health Minister Rajesh Tope writes letter to Corona Warrior Doctors to Thank on Doctor's Day)

Doctors Day | धार्मिक स्थळं बंद, देव तुमच्या रुपात, राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 8:45 AM

मुंबई : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि महान डॉक्टर विधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारतात एक जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस’ साजरा केला जातो. कोरोना काळात रुग्णांवर उपचार करुन त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका डॉक्टर बजावत आहेत. राज्यातील तमाम डॉक्टरांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहिले आहे. (Health Minister Rajesh Tope writes letter to Corona Warrior Doctors to Thank on Doctor’s Day)

राजेश टोपे यांचे पत्र

प्रिय डॉक्टर्स

“आज तुमचा दिवस.. डॉक्टर्स डे.. त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

“गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर, तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत. नागरिक काळजी घेताना दिसताहेत. त्याची तीव्रता वाढत नाहीये.”

“डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.”

“तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास 90 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. या संकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात.आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.”

-राजेश टोपे

याआधी परिचारिका दिनी, “तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार” असं भावनिक पत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नर्सेसना लिहिलं होतं.

वाचा पत्र : कोरोना युद्धात परिचारिकाच सैनिक, तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत; जयंत पाटलांचे नर्सना भावनिक पत्र

(Health Minister Rajesh Tope writes letter to Corona Warrior Doctors to Thank on Doctor’s Day)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.