Food | नाश्त्याचा विचार करताय? दिवसभरासाठी ऊर्जा देणाऱ्या ‘या’ 5 रेसिपी नक्की करून पाहा!

सकाळची न्याहारी हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. यामुळे आपल्या शरीरास कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते.

Food | नाश्त्याचा विचार करताय? दिवसभरासाठी ऊर्जा देणाऱ्या ‘या’ 5 रेसिपी नक्की करून पाहा!
सकाळचा नाश्ता
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 5:54 PM

मुंबई : दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळची न्याहारी आपल्याला दिवसभरकाम करण्यासाठी ऊर्जा देते. सकाळचा नाश्ता हा नेहमी पचनास हलका आणि प्रोटीन्स युक्त असावा. नाश्त्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासह चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. सकाळचा नाश्ता हा दिवस भरातील पहिला आहार असतो (Healthy breakfast recipe for morning).

बरेच लोक सकाळी नाश्ता करणे टाळतात. परंतु, सकाळचा नाश्ता कधीच टाळू नये, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञदेखील नेहमीच देतात. सकाळची न्याहारी हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. यामुळे आपल्या शरीरास कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. न्याहारी वगळल्याने बर्‍याच आजारांना निमंत्रण मिळते.

कामाला महत्त्व देणारे कामाला उशीर होऊ नये, म्हणून अनेकदा सकाळचा नाश्ता न करताच बाहेर पडतात. ही एक मोठी चूक असून ती टाळायला हवी. संपूर्ण दिवस उत्साहवर्धक जाण्यासाठी आपल्या शरीराला दुपारच्या जेवणाआधी नाश्‍त्याची आवश्यकता असते. जर नाश्ता करणे टाळले, तर तीव्र भूक लागल्यानंतर शरीरातील फॅट्स आणि साखर संपून जाते. दुसरीकडे नाश्ता केल्यास दिवसभरासाठी कॅलरी मिळतात आणि पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे ऑफिसच्या कामातही उत्साह टिकून राहतो. सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी या काही सोप्या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता (Healthy breakfast recipe for morning).

पनीर भुर्जी

जर तुम्हाला दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करायची असेल तर, पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण पनीरमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून त्याची भुर्जी बनवू शकता. या पनीर भुर्जीबरोबर मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता.

अंडी

आपल्या सर्वांना माहित आहे की, अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. आपण त्यांना उकडून किंवा त्याची पोळी बनवून ब्रेडसह खाऊ शकता. अंड्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असते.

ओट्स इडली

इडली ही दक्षिण भारतातला आवडता पदार्थ आहे. आपल्या दिवसाच्या निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता. ओट्समध्ये प्रथिने तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. ही इडली सांबार आणि नारळ चटणीसह सर्व्ह करू शकता.(Healthy breakfast recipe for morning)

सोया उत्तपम

जर आपण नेहमीच्या न्याहारीला कंटळला असाल, तर उच्च प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असे, सोया उत्तपम बनवू शकता. त्यासाठी सोया पीठामध्ये पाणी मिसळून तव्यावर उत्तपम बनवू शकता. सोया उत्तपम बरोबर नारळाची चटणी खाऊ शकता.

प्रोटीन शेक

जर तुम्हाला सकाळी कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर ही सवय बदलली पाहिजे. चहा आणि कॉफी पिणे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. चहा-कॉफीऐवजी प्रोटीन शेक पिऊ शकता. केळी, सफरचंद, बदाम, काजू यासह दूध मिसळून त्याचा शेक अर्थात ज्यूस बनवून पिऊ शकता.

(Healthy breakfast recipe for morning)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.