Drugs Case | ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची ‘दिवाळी’ तुरुंगातच, दिवाळीनंतर जामीन अर्जावर सुनावणी!

या सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर आता दिवाळी नंतर निकाल देण्यात येणार आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची ‘दिवाळी’ तुरुंगातच, दिवाळीनंतर जामीन अर्जावर सुनावणी!
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 3:04 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Shushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs Connection) समोर आले आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला जामीन मिळाल्यानंतर आणखी आठ आरोपीनी जामिनासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज (Bail Application) केला आहे. या आठ जणांमध्ये रिया चक्रवर्ती हीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याचा देखील समावेश आहे. मात्र, या सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर आता दिवाळी नंतर निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे या सगळ्यांची दिवाळी आता तुरुंगातच जाणार आहे (Hearing on bail application of accused in drugs case after Diwali).

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण घडल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रग्ज पेडलर विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली होती. त्यानंतर आतापर्यंत 16/20 क्रमांकाच्या या गुन्ह्यात सुमारे 24 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सहा जणांना जामीन मिळाला आहे. तर आणखी आठ आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

करमजित मल्होत्रा, अंकुश अरनेजा, द्वान फर्नांडीस, क्षितीज प्रसाद, राहील, मुडोक या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला आहे. यावर एनसीबीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यांना आता दिवाळी संपण्याची वाट बघावी लागणार आहे (Hearing on bail application of accused in drugs case after Diwali).

जामिनासाठी शौविकची धडपड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती. रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शौविक चक्रवर्तीने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतातरी त्याची सुटका केली जाईल अशी आशा अभिनेत्री रिया चक्रवर्तीला वाटते आहे. शौविकला ड्रग्ज बाळगणे, खरेदी करणे आणि विक्री करणे अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकले गेले आहे.

मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टात शौविकने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका आदेशात म्हटले होते की, एनसीबी अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टाने स्वीकारलेला नाही, अशावेळी आरोपींना जबरदस्ती तुरूंगात ठेवता येणार नाही.’ या आदेशानंतर आता पुन्हा एकदा जामिनासाठी शौविकची धडपड सुरू झाली आहे.

(Hearing on bail application of accused in drugs case after Diwali)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.