स्मार्ट गाय! पुराच्या पाण्यात 4 गायी वाहून गेल्या, एका गायीची कमालीची हुशारी

पुलावरुन चार गायी वाहून गेल्या. या पुलावरुन पाच गायी चालत जात होत्या. पुलावर वेगाने पाणी वाहत होतं. पाय उचलला की पाणी त्याच्या प्रवाहासोबत गायींना वाहून नेत होतं.

स्मार्ट गाय! पुराच्या पाण्यात 4 गायी वाहून गेल्या, एका गायीची कमालीची हुशारी
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 1:55 PM

पालघर : राज्यभरात पावसाचा (Rain) जोर आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. पालघर जिल्ह्यात तर पावसाने (Palghar rain) हाहा:कार माजवला आहे. तुफान पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीवरील धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्याने डहाणू- नाशिक रस्त्यावरील पुलावर पाणी आलं. हा पूल जुना असल्याने त्यावरुन दुचाकी वाहनांची ये-जा  होत असते. सध्या या पुलावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. मात्र जनावरं किंवा गायी या पुलावर जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली नाही.

त्यामुळे या पुलावरुन चार गायी वाहून गेल्या. या पुलावरुन पाच गायी चालत जात होत्या. पुलावर वेगाने पाणी वाहत होतं. पाय उचलला की पाणी त्याच्या प्रवाहासोबत गायींना वाहून नेत होतं. पाच गायी एका पाठोपाठ एक जात होत्या, त्यावेळी एक- एक करुन चारही गायी प्रवाहात वाहून गेल्या. त्यामुळे एकच गाय पुलावर उरली.

आपल्या सहकारी वाहून गेल्याचं पाहून वाचलेल्या गायीने युक्ती लढवली. पुढे धोका आहे हे ओळखून ही गाय मागे वळली. अलगद-हळूवार पाय टाकत ती मागे आली आणि आपला जीव वाचवला. संकटात धीर धरुन, प्रसंगावधान दाखवणं आवश्यक असतं, हे या गायीच्या प्रसंगावरुन दिसून येतं.

VIDEO :

VIDEO :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.