रत्नागिरीत रेकॉर्डब्रेक पाऊस, जुलै महिन्यात 2000 मिलिमीटरचा आकडा गाठला

Heavy Rain in Ratnagiri | गेल्या 24 तासात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात 102 मिलीमीटर झालाय. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यत 1265 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय.

रत्नागिरीत रेकॉर्डब्रेक पाऊस, जुलै महिन्यात 2000 मिलिमीटरचा आकडा गाठला
पाऊस
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 1:56 PM

रत्नागिरी: गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पहायला मिळत आहेत. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा सरींवर कोसळण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलिमिटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना 1 जूनपासून आजपर्यत पावसानं 1939 मिलिमिटरचा टप्पा गाठलाय.

गेल्या 24 तासात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात 102 मिलीमीटर झालाय. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यत 1265 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. दुपारानंतर सरींवर पाऊस कोसळतोय. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 5 जण बेपत्ता झाले आहे. सध्या या पाचही जणांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.

रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या या तुडुंब भरुन वाहत आहे. तसेच शहरातील अनेक नाले दुथडी भरुन वाहत आहे. रायगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल पाच जण बेपत्ता झाले आहेत. रायगडमधील स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टिमसोबत आपत्ती व्यवस्थापनाची शोध मोहीम सुरु आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही.

रायगडमधील नद्यांना पूर 

दरम्यान रायगड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पाऊस कमी झाला आहे. रायगडमधील कुडंलिका, आबां आणि पातळगंगा नदी इशारा पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर रात्री खालापूर टोलनाका परिसरात घाट चढताना दरड कोसळल्याची घटना घडली. खोपोली हद्दीत त्याठिकाणी हायवे एक्स्टेंशनचे काम सुरु आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

बोरघाट पोलीस आणि आय. आर.बी यत्रंणेने दरड हटवून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. ट्रॅफिकचा अडथळा दूर केला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 4 घरांचे नुकसान झाले होते. त्याठिकाणी दरडीमधील भेगा रुंदावल्या असल्याचे पहायला मिळाले. तिथे संरक्षक भिंत बाधंण्याची मागणी होत आहे. काल रात्रीपासून पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरले. त्यामुळे पाली खोपोली आणि खुरावले भैरव रस्ता रहदारीकरिता खुला करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

MNS Disaster Management Squad | मनसेचे 50 प्रशिक्षित कार्यकर्ते, पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाची वैशिष्ट्यं काय?

Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु

पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.