Ramzan Eid : ईद साधेपणे करुन गरिबांना मदत करा, मनमाडच्या मौलानांचे मुस्लीम बांधवांना आवाहन

देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता यंदा मनमाड शहरात सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला (Ramzan Eid Celebration Nashik) आहे.

Ramzan Eid : ईद साधेपणे करुन गरिबांना मदत करा, मनमाडच्या मौलानांचे मुस्लीम बांधवांना आवाहन
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 12:44 PM

नाशिक : देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता यंदा मनमाड शहरात सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला (Ramzan Eid Celebration Nashik) आहे. याबरोबरच ईद निमित्त नेहमी केली जाणारी खरेदी न करता सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू यांना मदत करावी, असे आवाहन शहरातील सर्व प्रमुख मौलाना यांनी मुस्लीम बांधवांना केले (Ramzan Eid Celebration Nashik) आहे.

याशिवाय लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. शासनाने लागू केलेले सर्व नियम तंतोतंत पाळावे असे ही आवाहन मौलानांनी केले. त्यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद देत यंदा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मशिदीच्या गेटसमोर ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत.

इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला एक आगळेवेगळे महत्व आणि स्थान आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात रोज 5 वेळा नियमितपणे अदा केली जाणाऱ्या नमाज व्यतिरिक्त तरावीहची विशेष नमाज देखील अदा केली जाते. शिवाय संपूर्ण महिना रोजे धरले जातात त्यासाठी पहाटे सहेरी केली जाते. तर सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो.

रमजान महिना सुरु होताच गावखेडा असो अथवा मोठे शहर सर्व ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी असते. शिवाय या महिन्यात जकात आणि फित्रा देखील मोठ्या प्रमाणात दिला जातो. मात्र यंदा देश आणि जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याने शहरातील सर्व मशिदीत फक्त मौलाना आणि 3 जण नमाज अदा करत आहेत. तर इतर सर्व मुस्लीम बांधव हे आपापल्या घरात नमाज, रोजा इफ्तार करून नमाज अदा करत आहेत.

रमजान महिना शेवटच्या टप्प्यात आला असून अवघ्या काही दिवसावर ईद येवून ठेपली आहे. मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशावर कायम आहे. त्यामुळे यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन शहरातील प्रमुख मौलानांनी केले.

कोरोनामुळे 2 महिन्यापासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर असलेल्या सर्व जातीधर्मांच्या लोकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू खरेदी न करता या गोरगरिबांची मदत करण्याचे आवाहन मौलानांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला शहरातील मुस्लीम बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

“आम्ही भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे. देशावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे. आम्ही देखील सरकारसोबत आहोत. कोरोनामुळे आमच्या हिंदू बांधवांनी रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, जैन बांधवांनी महावीर जयंती, भीम सैनिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. मग आम्ही ईद धुमधडाक्यात कशी साजरी करू शकतो. आम्ही देखील या देशाचे केवळ नागरिक नव्हे तर देशभक्त नागरिक आहोत. भारतातील कोणताही मुस्लिम शासनाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही. यावर्षी आम्ही ईद अगदी साधेपणाने साजरी करणार आहोत”, असं मनमाड येथील जामा मशिदीतले मौलाना अस्लम रिझवी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Malegaon Corona | मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ

Malegaon Corona | राजेश टोपेंसोबत बैठक सुरु असतानाच रिपोर्ट आला, मालेगावचे मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.