133 भारतीय नागरिकांची पाकिस्तानातून सुटका, सोमवारी मायदेशी परतणार, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाची माहिती
पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक सोमवारी ( 19 ऑक्टोबर) मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. High Commission of India
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. येत्या सोमवारी ( 19 ऑक्टोबर) नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. उच्चायुक्त कार्यालयाकडून भारतात परतणाऱ्या नागिरकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (High Commission of India in Pakistan is facilitating the return of 133 Indian Nationals from Pakistan to India)
भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये 4 भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळं त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
High Commission of India in Pakistan is facilitating the return of 133 Indian Nationals from Pakistan to India on 19 October 2020. The repatriation will be carried out as per the attached list. https://t.co/HACQODQ5YX
— India in Pakistan (@IndiainPakistan) October 15, 2020
सप्टेंबर महिन्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि 37 भारतीय नागरिकांसह एकूण 133 नागरिकांना भारतात परत पाठवणार आहे.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचं ट्विट
पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं 15 ऑक्टोबरला ट्विट केलं होत. त्यामध्ये ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि 37 भारतीय नागरिकांना भारतात जाण्याची सुविधा देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वाघा बॉर्डर पोहोचण्याचे आदेश
133 नागरिकांच्या यादीत ज्या भारतीयांचा समावेश आहे त्यांना 19 ऑक्टोबरला वाघा-आटारी बॉर्डरवर पोहोचण्याचे आदेश भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या:
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा 1 जवान शहीद
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा
(High Commission of India in Pakistan is facilitating the return of 133 Indian Nationals from Pakistan to India)