अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये उदय सामंताची गाडी अडवण्याचा प्रयत्न, सामंत म्हणतात…

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा संदर्भात येत्या 2-3 दिवसात तोडगा काढू, असेही ते म्हणाले. (Uday Samant On ABVP agitation)

अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये उदय सामंताची गाडी अडवण्याचा प्रयत्न, सामंत म्हणतात...
Follow us
| Updated on: Sep 20, 2020 | 3:00 PM

नाशिक : “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनांना किंवा हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझे दौरे सुरुच राहतील,” अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आयोजित बैठकीसाठी उदय सामंत आले होते. त्यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Uday Samant On ABVP agitation)

“अभाविपच्या या आंदोलनामुळे माझं नाव प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एवढा मोठा बंदोबस्त दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्याविरोधात आंदोलन करुन स्वतःच्या चळवळीत, पक्षात स्थान मोठं करण्याचा अभाविपच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा आंदोलनांना, हल्यानं मी घाबरत नाही, माझे दौरे सुरूच राहतील,” असे उदय सामंत म्हणाले.

“अभाविपच्या सर्व मागण्यांवर काम करत आहोत. पण आमच्यामुळेच काम झाले हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न सुरु आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

“यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत लागणाऱ्या मदतीची चर्चा झाली. अंतिम वर्षाच्या परीक्षा 30 सप्टेंबरपर्यत पूर्ण होतील. यातील 50 पैकी 30 प्रश्न सोडवणं हे बंधनकारक असणार आहे. या विद्यापीठात 2 लाख 91 हजार विद्यार्थी असून त्यातील 20 टक्के विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. म्हणून शासनाच्या सेतू सेंटरचा वापर या परीक्षांसाठी करता येईल का याबाबत चर्चा करणार आहे,” असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

“MPSC परीक्षा संदर्भात येत्या 2-3 दिवसात तोडगा काढू”

पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला नाशिकमध्ये सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. याचा शुभारंभ दिवाळीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा संदर्भात येत्या 2-3 दिवसात तोडगा काढू, असेही ते म्हणाले.

“नाणारला पाठिंबा देणारे स्थानिक नाहीत”

कोकणातील नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाला पाठिंबा देणारे हे स्थानिक नाहीत. जर ही स्थानिकांची मागणी असेल तर त्याला शिवसेना विरोध करणार नाही, असेही उदय सामंतांनी स्पष्ट केलं. (Uday Samant On ABVP agitation)

संबंधित बातम्या : 

पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट, प्रवीण दरेकरांची टीका

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा नाही : उदय सामंत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.