मुंबई : महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमानचालीसा हा वाद सुरु असतानाच कर्नाटकातील (Karnataka) मंगळूरु जवळ असणाऱ्या मलाली येथील एका जून्या मशिदीच्या नुतणीकरणा दरम्यान मंदिरासारखी अवशेष सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एएनआयने (ANI) दिलेल्या माहितीनुसार स्थानिक लोक आणि आधिकाऱ्यांच्या मते या ठिकाणी मंदिर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मुद्द्यावर जो पर्यंत कागदांची पडताळणी होत नाही तो पर्यंत मशिदीच्या (mosque) नुतनीकरणाचे काम थांबवावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात आता प्रशासन कामाला लागले आहे. या ठिकाणी आता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान दक्षिण कन्नड आयुक्तलयाकडून पुढील आदेशापर्यंत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासन जमिनीचे कागदपत्रांविषय माहिती मिळवत असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे.
क्षेत्रीय आधिकारी आणि पोलीस विभागाकडून माहिती मिळाली असून जिल्हा प्रशासन जमिनीच्या जुन्या नोंदी आणि मालकी हक्काच्या तपशिलांच्या नोंदी तपासत आहे. दोन्ही विभागाकडून आलेले अहवाल आम्ही तपासणार आहे अशी माहिती दक्षिण कन्नडच्या उपायुक्तांनी दिली. या प्रकरणात लोकांनी कायदा हातात न घेता शांत राहण्याची विनंती देखील त्यांनी या वेळी केली.
संंबंधीत बातम्या
Vastu Tips | घरात काटेरी रोप लावल्यास काय होते? जाणून घ्या रंजक माहिती
22 April 2022 | 21 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’