आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज आठव्या दिवशी अपयशी ठरली.

आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 9:02 AM

नागपूर : आमच्या मुलीने सहन केलं, मात्र आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे करा, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया हिंगणघाट जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या पीडित शिक्षिकेच्या वडिलांनी (Hinganghat Burnt Victim Father Reaction) केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी येईपर्यंत पीडितेचं पार्थिव हाती न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

आमच्या मुलीने सहन केलं, मात्र आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे झाली पाहिजे. त्याला जनसमुदायासमोर बाहेर काढा, त्याच्यावरही हल्ला व्हायला हवा, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्नता मयत शिक्षिकेच्या वडिलांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली. आमच्या कुटुंबाला मदत करावी, ही मागणी वडिलांनी सरकारकडे केली.

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज आठव्या दिवशी अपयशी ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (सोमवार 10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली.

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेचं पार्थिव पोलिसांकडे सुपूर्द केलं जाणार आहे.

पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली.

पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेत न्यायालयाने शुक्रवारी रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पीडितेला न्याय देण्यासाठी ‘हिंगणघाट बंद’ची हाक

पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर उतरला होता. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून झाली होती. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Hinganghat Burnt Victim Father Reaction

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.