हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर जनक्षोभ, रुग्णवाहिका अडवली, पोलिसांनाही धक्काबुक्की

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर हिंगणघाटमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त करत आहेत.

हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर जनक्षोभ, रुग्णवाहिका अडवली, पोलिसांनाही धक्काबुक्की
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 1:31 PM

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर हिंगणघाटमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त करत आहेत. यावेळी तरुणीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही नागरिकांनी अडवलं. हिंगणघाटमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 300 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कलोडे चौकात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. याच महामार्गावरुन पीडित प्राध्यापक तरुणीचा मृतदेह रुग्णवाहिकेने  तिच्या गावी पोहोचवला जाणार होता. मात्र, संतप्त नागरिकांनी रस्त्यातच रुग्णवाहिका अडवली. यावेळी नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावाचं झालं आहे.

हिंगणघाट शहरातील संविधान चौकात नागरिकांनी फुलं वाहून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. तसेच, पीडितेला न्याय द्या, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी नागरिकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.

पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू (Hinganghat Burn Victim Teacher Death) झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death).

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.