इस शहर के हवाओं मे खुशबू है और यहाँ के पानी में आबे हयात है…. औरंगाबादची भुरळ पडलेला प्रसिद्ध प्रवासी कोण?
शहराला मध्ययुगात भेट देणारे प्रवासी, इतिहासकार, विद्वान, संशोधक, कवी यांची यादीही भली मोठी आहे. अशाच एका जाणकाराला इथल्या कलात्मक वास्तुंची भुरळ पडली आणि त्यानं स्वयंस्फूर्तीने या ओळी लिहिल्या.
औरंगाबादः महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद. इथल्या गल्लीबोळातून फिरताना इतिहास (Aurangabad History) इतिहास अक्षरशः बोलतो. अनेक भागांना जोडणारे भव्य दरवाजे असो किंवा तटबंदी, हमाम असो की देवड्या, मंदिर, मशीदींनी इतिहास जिवंत ठेवलाय. मध्यकाळातील घटना, प्रसंग, कथांचे हे साक्षीदार. इथल्या वास्तू सतत आपल्याशी संवाद साधतात, वैभवशाली इतिहासाचे दाखले देतात. खरं तर औरंगाबाद शहरातच एवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत की बाजूच्या तालुक्यातील वेरूळ, अजिंठ्यासारख्या (Ellora Ajanta Caves) जागतिक वास्तूंकडे न जाताही एक उत्तम पर्यटन सहल होऊ शकते. इथला इतिहास अभ्यासता येतो. इथल्या वास्तुंचं सौंदर्य डोळ्यात भरून घेता येतं. शहराला मध्ययुगात भेट देणारे प्रवासी, इतिहासकार, विद्वान, संशोधक, कवी यांची यादीही भली मोठी आहे. अशाच एका जाणकाराला इथल्या कलात्मक वास्तुंची भुरळ पडली आणि त्यानं स्वयंस्फूर्तीने या ओळी लिहिल्या. इस शहर के हवाओं मे खुशबू है और यहाँ के पानी में आबे हयात है….
औरंगाबादची भुरळ पडलेला तो प्रवासी कोण?
इस शहर के हवाओं मे खुशबू है और यहाँ के पानी में आबे हयात है.. असं औरंगाबादचं वर्णन करणारा प्रवासी म्हणजे मिर्झा सादिक असफानी. अकबराबादहून जुन्नरला शहाजहानला भेटायला जात होते. ते काही दिवस तत्कालीन खडकी नावाच्या म्हणजेच आजच्या औरंगाबाद शहरात थांबले. शहरातल्या कलात्मक वास्तू, पाण्याचे हौद, फवारे, धबधबे, बाग पाहून इतके प्रभावित झाले की, त्यांनी औरंगाबादच्या प्रेमात एक कविताच लिहिली. त्याच कवितेच्या या ओळी होत. शहराच्या कानाकोपऱ्याची खडान् खडा माहिती असलेले आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशसी आणि डॉ. रफत कुरेशी यांच्या ‘औरंगाबाद-नामा’ या पुस्तकात औरंगाबादच्या प्रेमात पडलेल्या कलासक्त जाणकार अन् इतिहासकारांची माहिती आहे.
फ्रेंच प्रवासी थिवनॉटही भारावला होता…
1667 मध्ये औरंगाबादला आलेला फ्रेंच प्रवासी थिवनॉट हा देखील औरंगाबादमधील वास्तू पाहून भारावला होता. त्याने एका लेखात औरंगाबादबद्दल लिहिलं… औरंगजेब बादशहाने इथं एक सुंदर मकबरा बांधलाय. ज्याला रचनात्मकतेने सजवलं आहे. यात मोठा घुमट, चार आकर्षक मिनार, छोटे घुमट, हौद, फवारे इत्यादी आहे. शहरातली मंदिरं, मशीद, सराय बगीचे सुंदर आहेत. येथील इमारती उंच असून प्रत्येक घरासमोर घनदाट झाडी, हौद आणि बगीचे आहेत.
उंच बुरुजावर औरंगाबादचे वर्णन
प्रसिद्ध इतिहासकार डॉ, ब्रॅडली यानंही Statistics of the city of Aurangabad या त्याच्या पुस्तकात शहराचं अत्यंत रोमांचक चित्र उभं केलं आहे. एका उंच बुरुजावर त्यानं हे वर्णन लिहिलंय.. हा इतिहासकार म्हणतो, या शहराचा काही भाग खोल तर काही भाग उंचावर आहे. शहराच्या मधोमध नदी वाहते. येथील इमारती दाट झाडांच्या मधोमध लपलेल्या आहेत. झाडांच्या मधून घुमट, कळस, मिनार दिसला नसता तर एखाद्या प्रवाशाला हे जंगलच वाटले असते. पश्चिमेच्या तटबंदीपलीकडे छावणीने जागा व्यापली आहे. येथून मधून टेकड्याही दिसतात. अशाच एका उंच टेकडीवर एक विलक्षण, अद्भुत असा दौलताबादचा किल्ला दिसतो… प्रसिद्ध कवी केदारनाथ सिहांनी वर्णन केलेल्या एका शहराचं वर्णनही औरंगाबादसारखंच भासतं. वाचून पहा, औरंगाबादकर असाल तर हे वर्णन नक्की काळजाला भिडेल..
इस शहर में धूल धीरे-धीरे उडती है
धीरे-धीरे चलते है लोग धीरे धीरे बजते है घन्टे
शाम धीरे-धीरे होती है यह धीरे-धीरे होना
धीरे-धीरे होने की सामूहिक लय दृढता से बाँधे हे समूचे शहर को
इस तर कि कुछ भी गिरता नही है कि हिलता नही है कुछ भी’
इतर बातम्या-