हल्दीराम असो वा कुठलाही राम, सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाई करु : गृहमंत्री

जे कोणीही राज्य सरकारच्या सूचनेचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल," असे अनिल देशमुख (Anil Deshmukh on Corona Virus) म्हणाले.

हल्दीराम असो वा कुठलाही राम, सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाई करु : गृहमंत्री
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 7:07 PM

नागपूर : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 49 वर पोहोचली (Anil Deshmukh on Corona Virus) आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग अजून वाढू नये त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारकडून वारंवार हात धुवा, गर्दी टाळा असे आवाहन केलं जात आहे. नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. “जे कोणीही राज्य सरकारच्या सूचनेचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असे अनिल देशमुख म्हणाले.

“राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक (Anil Deshmukh on Corona Virus) सूचना दिल्या आहेत. मात्र जर कोणी सूचनेचे पालन करत नसेल मग तो हल्दीराम असो किंवा कुठलाही दुसरा राम असो, त्याच्यावर कडक कारवाई होईल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

“राज्यातील सर्व दारुची दुकान, बार, हॉटेल्स, क्लबना सूचना दिल्या आहेत. सध्या मास्क आणि सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक जण याची साठवणूक करत आहे. मात्र जर कोणी अशाप्रकारे साठेबाजी करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल,” असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

Corona virus | आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, मुले आणि वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला, मोदी सरकारचे मोठे निर्णय

“राज्यात जवळपास 60 हजार कैदी आहेत. त्यांचीही आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच जे कोणी नवीन कैदी येतील त्याला वेगळं ठेवण्यात येईल,” असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना हे फार मोठं आवाहन आहे. हे चांगल्या पद्धतीने पेलवण्यासाठी त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय मंत्री चांगल्या पद्धतीन काम करत आहेत. त्यांच्या सूचनेचे जनतेने पालन करणं गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले

“जनतेने एकत्र येऊ नये, शक्यतो गर्दी टाळा, घराच्या बाहेर महत्त्वाचं काम असल्याशिवाय पडू नये, वारंवार हात धुवावे, डोळ्याला, नाकाला किंवा चेहऱ्याला हात लावू नये,” अशा अनेक सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

“काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा पसरवत आहे. जे कोणी अशाप्रकार अफवा पसरवतील त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच ज्या व्यक्ती क्वारंटाईनमध्ये आहेत त्यांनी तिथेचं राहावं. जर कोणी तिथून पळून जात असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” असेही गृहमंत्री म्हणाले.

जर शक्य असेल तर नागरिकांनी लग्न सभारंभ पुढे ढकलावेत किंवा लग्न सभारंभ हे अतिशय छोट्या प्रमाणात आटपा असेही ते (Anil Deshmukh on Corona Virus) म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.