ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश
कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा - अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता.
मुंबई : मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी तुलना आणि ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. (Home Minister Anil Deshmukh Orders Probe in Kangana Ranaut Drugs Connection)
कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा – अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे.
हेही वाचा : आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार
“आपण हॅश ट्राय केलं होतं, पण ते आवडलं नव्हतं, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं” असंही अध्ययनने म्हटलं होतं.
रिया चक्रवर्ती के बाद अब कंगना रनौत के भी ड्रग्स कनेक्शन की होगी जांच. महाराष्ट्र सरकार ने मुंबई पुलिस को दिए जांच के आदेश. अभिनेता अध्ययन सुमन ने अपने एक इंटरव्यू में कंगना द्वारा ड्रग्स का सेवन करने की बात कही थी.
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) September 11, 2020
(Home Minister Anil Deshmukh Orders Probe in Kangana Ranaut Drugs Connection)
शिवसेना आमदार सुनिल प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत, मात्र कोणता अधिकारी तपास करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने कंगनाची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
ड्रग्जचा आरोप ते हक्कभंग
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला जात आहे. तर कंगनाविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
कंगनाकडून ऑफिसच्या तोडकामाची पाहणी
कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसच्या पाडकामाची पाहणी केली.
संबंधित बातम्या :
‘कंगनापासून दूर राहा’, गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन
(Home Minister Anil Deshmukh Orders Probe in Kangana Ranaut Drugs Connection)