Anil Deshmukh | नागपुरात रेतीघाटांवर गृहमंत्र्यांची धाड, रेती माफियांचे कंबरडे मोडण्याचा अनिल देशमुखांचा निर्धार
गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज अचानकपणे नागपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध रेती घाटांवर धाडी टाकल्या आहेत.
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत (Anil Deshmukh Raid On Illegal sand Mining) यांनी आज अचानकपणे नागपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध रेती घाटांवर धाडी टाकल्या आहेत. खापा येथील रेती घाटांजवळ मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा यावेळी आढळून आला. नागपूर जिल्ह्यात सुरु असलेला अवैध रेतीघाटाचा गोरखधंदा बंद करण्यासाठी आणि रेतीमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उच्चअधिकाऱ्यांना दिले (Anil Deshmukh Raid On Illegal sand Mining).
गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सावनेर, रामटेक, कामठी आणि उमरेड या विधानसभा मतदारसंघातील पोलीस स्टेशनला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल आणि उमरेडचे आमदार राजू पारवे उपस्थित होते. गृहमंत्र्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रेतीचा अवैधपणे उपसा होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी या रेती माफियांचे साम्राज्य उध्वस्त करण्याच्या उद्देशाने आज संयुक्तपणे कुणालाही कुणकुण लागू न देता रेती घाटांवर छापे मारले.
आज #खापा येथील रेती घाटची पाहणी केली. यावेळी माझ्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री @NitinRaut_INC जी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/0GnVV2Ab2R
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 21, 2020
या रेती घाटावरील धडक कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक रेती माफियांनी पळ काढल्याचे समजते. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनबद्ध अवैध रेती उपसाचा प्रकार उघडकीस आला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यात रेतीमाफियांच्या विरोधात झालेल्या कारवाईची माहिती विचारण्यात आली. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार मुंबईत असल्याने या कारवाईत सामील होऊ शकले नाही (Anil Deshmukh Raid On Illegal sand Mining).
तिथून अधिकाऱ्यांना घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी छापे अचानकपणे छापे मारण्याची सूचना केली. नागपुरातून मंत्र्यांचा काफिला थेट सावनेर येथे पोहोचला. सावनेर येथील पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी खापा येथील रेती घाटावर धाड मारली.
यावेळी खापा येथील नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा असल्याचे दिसून आले. या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचे दिसून आले. रेती माफियांनी अवैधपणे केलेल्या रेती उपसामुळे झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही मंत्र्यांनी कन्हान येथील रेती घाटावर धाड मारली. यावेळी मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा आढळून आला. या रेती माफियांचे कंबरडे मोडण्यासााठी एसडीओ आणि तहसीलदारांनी धडक कारवाई करावी, अन्यथा या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
या कारवाईत विभागीय आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
रेतीमाफियांचे कंबरडे मोडा : अनिल देशमुख
गेल्या काही वर्षांपासून रेतीमाीयांना संरक्षण मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा होत आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाची हानी होत आहे. जिल्ह्यातील रेती माीयांचे कंबरडे मोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही कारवाई न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलेच धारेवर धरले. कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला. महसूल पोलीस विभाग व पर्यावरण विभाग यांची संयुक्त समिती तयार करुन रेती माफियांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यावेळी गृहमंत्री यांनी दिले.
आज मौदा पोलीस ठाण्याला भेट देऊन रेती घाट विषयी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात चौकशी केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री @NitinRaut_INC जी, आ.आशिष जयस्वाल जी, आ.राजू पारवे जी, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/t61e8QbFlc
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 21, 2020
Anil Deshmukh Raid On Illegal sand Mining
संबंधित बातम्या :
60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात…
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख