Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी, ‘सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, जेणेकरून सत्य लोकांसमोर येईल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने आपला अहवाल (Report) सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी, ‘सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, जेणेकरून सत्य लोकांसमोर येईल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे (Home Minister of Maharashtra Anil Deshmukh reaction on Sushant case After AIIMS report).
‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने केलेल्या चौकशीचा रिपोर्ट, लवकरात लवकर यावा, जेणेकरुन लोकांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सत्य काय आहे हे कळेल, आतापर्यंत आम्हाला ॲाफीशियली याबाबत सीबीआयकडून काहीही माहिती मिळाली नाही’, असेही गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे.
तर, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रोफेशनल पध्दतीने तपास केला. यावर आता सर्वोच्च न्यायालय आणि एम्सच्या अहवालानंतर (AIIMS report) शिक्कामोर्तब झाले, असे म्हणत त्यांनी सीबीआयला टोला देखील लगावला आहे.
महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला : अमेय घोले
दरम्यान, एम्सचा अहवाल समोर आल्यानंतर ‘महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला, मात्र एम्सच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली’, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.
“दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सुशांत सिंहची आत्महत्या झाल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे राज्य सरकार मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस योग्य तपास करत होती हे सिद्ध होतंय. पण काहींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला होता. एमच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली”, असे अमेय घोले म्हणाले. (Home Minister of Maharashtra Anil Deshmukh reaction on Sushant case After AIIMS report)
हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे कळते आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.
सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र एम्सच्या अहवालाने, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणाऱ्यांना तोंडघशी पाडले आहे.
(Home Minister of Maharashtra Anil Deshmukh reaction on Sushant case After AIIMS report)
Sushant Singh Rajput |सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावाhttps://t.co/Qw0tSL9yrb#SushantSinghRajput #AIIMS #AIIMSReport #SushantSinghRajputCase
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 3, 2020
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा