बच्चू कडू यांनी या घोड्यावर बसून रपेट मारली. या अनोख्या भेटीने बच्चू कडू चक्रावून गेले होते.
Follow us
अमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना अनोखी भेट देण्यात आली आहे. बच्चू कडू यांना नांदगाव खंडे इथे एका कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी चक्क पांढर शुभ्र घोडा भेट म्हणून दिला आहे. या अनोख्या भेटीची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
शेतकरी नेते आणि आपल्या आंदोलनाने नेहमीच चर्चेत असलेले आक्रमक आमदार म्हणून बच्चू कडू यांचं नाव आहे.
कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करणं, कामचुकार अधिकाऱ्यांशी बाचाबाची किंवा हुशार आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा सत्कार अशा विविध कारणांनी बच्चू कडू चर्चेत असतात.
जिल्हा आणि सर्व तालुका स्थरीय अधिकाऱ्याला शासकीय वाहन शासनातर्फे दिले गेले आहे. मात्र अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला शासकीय वाहन नव्हते. बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांना चार चाकी गाडी भेट दिली होती.
त्याची परतफेड म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी चक्क बच्चू कडू यांना एका कार्यक्रमात पांढरा शुभ्र घोडाच भेट म्हणून दिला.
बच्चू कडू यांनी या घोड्यावर बसून रपेट मारली. या अनोख्या भेटीने बच्चू कडू चक्रावून गेले होते.
बच्चू कडू हे शालेय जीवनात घोड्यावर बसून शाळेत जात असत. त्यांना घोड्यावर स्वार होणे आवडते, असं त्यांनी सांगितलं.