अहमदनगर : राज्यात कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढ (Jamkhed Corona Hotspot) आहे. अहमदनगरमधील जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज (26 एप्रिल) तीन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे. जामखेड शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलं आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र जामखेड हे कोरोनाचे हॉटस्पॉट कसं बनलं याचा प्रशासन शोध घेत आहे.
जामखेड शहरातील काजी गल्ली येथील मशिदमध्ये दिल्लीतील मरकजच्या (Jamkhed Corona Hotspot) कार्यक्रमातून 14 ताब्लिगी जमातीचे परदेशी नागरिक सापडेल. त्यातील दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा प्रभाव वाढत गेला. यातील सर्व रुग्ण नुराणी कॉलनीतील आहे.
असा वाढला जामखेडचा आकडा?
जामखेडचा आकडा नेमका कसा वाढला याचा प्रशासन सध्या शोध घेत आहे. त्यानुसार जामखेडमध्ये ताब्लिगी जमातीचे 2 परदेशी नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कातील 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पाॉझिटिव्ह आले.
यानंतर काही दिवसांनी एका वयोवृद्ध 65 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला. त्यानंतर त्याच्या दोन्ही मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर त्या दोन्ही मुलांच्या मित्रांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या मित्रांपासून त्यांच्या वडिलांना आणि शेजारील कुटुंबांना झाला. या कुटुंबातील तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
जामखेडमध्ये 17 कोरोना रुग्ण
त्यामुळे सध्या जामखेडचा आकडा 17 वर पोहोचला आहे. तर नगर जिल्हातील कोरोनाबाधितांची संख्या 43 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 14 रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलवण्यात आला आहे. त्यामुळे जामखेडला भिलवडी पॅटर्न राबवावा अशी मागणी माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1495 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1419 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 15 अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या 690 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. तर 122 जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात 102, एआयएमएसमध्ये 06 व्यक्ती उपचार घेत आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले (Jamkhed Corona Hotspot) आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात तीन दिवसात ‘कोरोना’चे 298 नवीन रुग्ण, भवानी पेठेत दोनशेपार, कोणत्या प्रभागात किती?
CORONA | घाबरु नका, वेळ पडलीच तर सज्ज, उद्धव ठाकरेंनी गोरेगाव-वरळीतील तयारीचे फोटो दाखवले