नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या जोरदार टक्कर पाहायला मिळतीये. भाजप-तृणमुलमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अमित शहा दोघांनीही आपापल्या पद्धतीने बंगाल जिंकण्याचा निर्धार केलाय. दरम्यान, केवळ रणनिती बनवण्यातच अमित शहा पुढे नाहीत तर संपत्तीमध्येही अमित शहा ममता बॅनर्जी यांच्या 133 पटींनी पुढे आहेत. अमित शाहांची संपत्ती ममता यांच्यापेक्षा 133 पटींनी अधिक आहे. (how much property Of Amit Shah And Mamata Banerjee)
लोकसभा 2019 च्या निवडणुकीवेळी अर्ज भरताना अमित शाह यांनी प्रतिज्ञापत्रात 40 कोटी 32 लाख 75 हजार 307 रुपये एवढी संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. एचडीआरच्या रिपोर्टनुसार, अमित शाह यांच्याजवळ केवळ 93 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्याचबरोबर अमित शाहांच्या नानावर बँकेत 37 लाखांच्या ठेवी आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीतही अमित शहा अगदी जागरुक आहेत. बॉन्ड्स, डिबेंचर आणि शेअर्सद्वारे त्यांनी सुमारे 21 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर एलआयसीमध्ये अमित शहा यांचा 22 लाख रुपयांचा जीवन विमा आहे. तसंच अमित शहा यांच्याजवळ 98 लाख रुपयांचं सोनं आहे.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ममता बॅनर्जी 30 लाख 45 हजार रुपयांच्या मालकीण आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडे 18 हजार 436 रुपयांची कॅश आहे. तसंच ममतांच्या 27 लाख 61 हजार 430 रुपयांच्या ठेवी आहेत. शेअर आणि डिबेंचर्समध्ये ममतांनी कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. पोस्टल सेव्हिंग स्कीममध्ये ममतांनी 18 हजार 490 रुपये गुंतवले आहेत.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ममता बॅनर्जी यांच्याजवळ 28 लाख रुपयांचं सोनं आहे. त्याचवेळी व्याज आणि इतर वस्तूंच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्याकडे 2,15,088 रुपयांची संपत्ती आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर 5,188 रुपयांचे वैयक्तिक कर्ज आहे.
(how much property Of Amit Shah And Mamata Banerjee)
संबंधित बातम्या
अब्जाधीश…. छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
राहुल गांधींची संपत्ती किती? मोदी सरकारच्या काळात कितीने वाढली?