HSC Result date | बारावी निकालाची तारीख जाहीर, ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार

गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. 

HSC Result date | बारावी निकालाची तारीख जाहीर, 'या' वेबसाईटवर निकाल पाहता येणार
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 7:47 AM

HSC Result date : पुणे : गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.  बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल.  HSC Result date

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. दरवर्षी मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं सांगितलं होतं.

बोर्डाच्या सूचना

1) ऑनलाईन निकालाबाबत लगेच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळालवरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवारी 17 जुलै ते सोमवार 27 जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार 17 जुलै ते बुधवार 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल

2) फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

3) फेब्रुवारी-मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. आता मात्र बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या 

HSC, SSC Result | दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.