पुणे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी सुरु केलेलं लाक्षणिक उपोषण मागे घेतलं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन, सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील असं आश्वासन दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेतलं. “आमच्या सर्व मागन्या मान्य झाल्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत”, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
“आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. सारथी संस्थेची स्वायतत्ता ठेवावी ही मागणी होती, ती मान्य केली आहे. परिहार यांचा राजीनामा स्वीकारु नये, ही मागणी होती, तसंच जे पी गुप्ता नावाचे अधिकारी खेळ करत होता”, असं संभाजीराजेंनी सांगितली.
“स्व्यवताता कायम राहील, कोणतीही अडचण नाही, गुप्तांना हटवण्यात येईल, परिहर यांचा राजीनामा स्विकारणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय देऊ, सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या, सुप्रीम कोर्टात आरक्षणासंदर्भात काही अडचण येणार नाही”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनीदिलं.
संभाजीराजेंना सारथीच्या अध्यक्षपद देण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत. “या संदर्भात मुख्यमंत्री आणि राजे यांच्याशी बोलतोय, त्यानुसार निर्णय घेऊ, शंभर टक्के सरकारनं निर्णय घेतला त्यामुळं उपोषण मागे घ्या, विनंती करतो”, असं एकनाथ शिंदेंनी आवाहन केलं.
गुप्तांना हटवा
“गुप्ता नावाचा अधिकारी हटवला नाही तर मग आम्ही पाहू”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढचं आंदोलन मुंबईत होईल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.