सांगलीत पत्नीकडून पतीची डोक्यात पहारीने वार करुन हत्या

सांगली : कौटुंबीक वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात पहारीने वार करुन हत्या केल्याची घटना सांगली शहरातील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीत घडली. चंद्रकांत धोंडिराम साळुंखे (वय 47) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन तासांतच शहर पोलिसांनी संशयित पत्नीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पत्नीवर सांगली शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. […]

सांगलीत पत्नीकडून पतीची डोक्यात पहारीने वार करुन हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

सांगली : कौटुंबीक वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात पहारीने वार करुन हत्या केल्याची घटना सांगली शहरातील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीत घडली. चंद्रकांत धोंडिराम साळुंखे (वय 47) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन तासांतच शहर पोलिसांनी संशयित पत्नीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पत्नीवर सांगली शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

चंद्रकांत साळुंखे पत्नी आणि मुलांसमवेत शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीत राहत होते. त्यांचा गणपती पेठेत चहाचा गाडा आहे. रविवारी सकाळपासूनच पती-पत्नीमध्ये कौटुंबीक कारणातून वाद सुरू होते. त्यात चंद्रकांत यांनी दारू पिऊन शिवीगाळ केल्याने त्यांच्या पत्नीने रविवारी सकाळीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी चंद्रकांत नेहमीच दारू पिऊन त्रास देतो असेही तक्रारीत म्हटले होते.

पत्नीच्या तक्रारीनंतर चंद्रकांत विरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघेही पती-पत्नी घरी निघून गेले. घरी गेल्यानंतरही त्यांच्यात वाद सुरूच होता.

रात्री पुन्हा चंद्रकांत यांनी दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते नेहमीच दारू पिऊन त्रास देत असल्याचा आरोप आहे. रविवारी दिवसभर पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही चंद्रकांत पुन्हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याने पत्नीचा राग अनावर झाला. रात्री सातच्या सुमारास पत्नीने रागाच्या भरात घरातील पहार घेऊन पतीच्या डोक्यात घातली.

पत्नीने याची माहिती चंद्रकांत यांच्या भावाला दिली. भाऊ तेथे आल्यानंतर त्यांनी चंद्रकांतला जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केलं. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.