चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या, मृतदेह ड्रममध्ये भरुन खोपोलीत फेकला
चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली.
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची (Husband Killed Wife In Navi Mumbai) धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. इतकंच नाही तर हत्या लपवण्यासाठी या पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह ड्रममध्ये टाकून खोपोली याठिकाणी टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि पतीच्या मित्राला अटक केली आहे (Husband Killed Wife In Navi Mumbai).
पत्नीवर चारित्र्याचा संशय, ओढणीने गळा आवळून हत्या
या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. नवी मुंबईतील घणसोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 22 जुलै रोजी रबाळे पोलीस ठाण्यात पती अंबुज तिवारी आणि पत्नी नीलम तिवारी हे बेपत्ता असल्याची तक्रार अंबुज तिवारीच्या वडिलांनी दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला. यावेळी 28 जुलै रोजी अंबुज तिवारीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अंबुज तिवारीची कसून चौकशी केली असता आपणच पत्नी नीलमचा ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचं त्याने कबुल केलं. अंबुजने आधी पत्नी नीलमचा ओढणीने गळा आवळळा, त्यानंतर तिचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या मोठ्या ड्रममध्ये टाकून मित्र श्रीकांत चौबेच्या टेम्पोने मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ फेकला.
याप्रकरणी पोलिसांनी अंबुज तिवारी आणि मित्र श्रीकांत चौबे याला अटक केली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
घराचे दरवाजे बंद केले, मग पत्नीचा गळा आवळला, वेडाच्या भरात हत्येचा संशयhttps://t.co/ubh2gIbZq4 #crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2020
Husband Killed Wife In Navi Mumbai
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, आर्थिक अडचणीतून वाद, जन्मदात्या बापाकडून मुलाची हत्या
फरशीवर डोकं आपटून गळा आवळला, पिंपरीत 4 वर्षांच्या चिमुरडीची जन्मदात्रीकडून हत्या