Marathi News Latest news Hyderabad encountertv9 exclusive photos of the accused from the encounter spot
EXCLUSIVE : जिथे एन्काऊंटर झाला, तिथले फोटो!
ज्या ठिकाणी हा एन्काऊंटर झाला त्याचे एक्स्क्लुझिव्ह फोटो टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत.
या एन्काऊंटरनंतर देशभरातून समाधान व्यक्त होत आहे. ज्या हिंस्त्रपणे तरुणीची हत्या करण्यात आली, त्या आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी हीच मागणी देशभरातून होती.
Follow us
तेलंगणातील गँगरेप आणि हत्येतील आरोपींचा एन्काऊंटर करुन, पोलिसांनी चारही आरोपींचा खात्मा केला. ज्या ठिकाणी हा एन्काऊंटर झाला त्याचे एक्स्क्लुझिव्ह फोटो टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत.
डॉक्टर तरुणी दिशावर (नाव बदलले) 27 नोव्हेंबरला चौघांनी बलात्कार करुन, तिला पेटवून देऊन हत्या केली होती. त्यानंतर आज जवळपास दहा दिवसांनी हैदराबाद पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. पण तिथे आरोपींनी पोलिसांची शस्त्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी चारही आरोपींचा खात्मा केला.
तेलंगणातील सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांच्या नेतृत्त्वात हे एन्काऊंटर झालं. कडकशिस्तीचा पोलीस अधिकारी म्हणून सज्जनार यांची ख्याती आहे.
या एन्काऊंटरनंतर देशभरातून समाधान व्यक्त होत आहे. ज्या हिंस्त्रपणे तरुणीची हत्या करण्यात आली, त्या आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी हीच मागणी देशभरातून होती.
पोलिसांनी त्यांना यमसदनी धाडून अतिशय उत्तम काम केल्याची भावना देशभरात आहे. सोशल मीडियावर तेलंगणा पोलिसांचं कौतुक होत आहे.
सज्जनार हे 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस सेवेत अनेक धडाकेबाज कारवाया त्यांच्या नावावर आहेत.
या एन्काऊंटरनंतर स्थानिकांनी जल्लोष तर केलाच, शिवाय ज्या ठिकाणी पोलिसांनी एन्काऊंटर केला, तिथे नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.