प्लॅस्टिकपासून पेट्रोल, अवघ्या 40 ते 50 रुपये लिटरने विक्री

जगभरात इंधनाचे साठे संपुष्टात येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, हैदराबादच्या 45 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअरने पेट्रोल बनवण्याचा एक मार्ग शोधला आहे.

प्लॅस्टिकपासून पेट्रोल, अवघ्या 40 ते 50 रुपये लिटरने विक्री
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 11:47 AM

हैदराबाद: जगभरात इंधनाचे साठे संपुष्टात येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, हैदराबादच्या 45 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअरने पेट्रोल बनवण्याचा एक मार्ग शोधला आहे. सतीश कुमार असं या इंजिनिअर प्रोफेसरचे नाव आहे. त्यांनी प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवल्याचा दावा केला आहे.

सतीश कुमार यांनी सांगितले, “तीन प्रक्रियांचा उपयोग करुन प्लॅस्टिकपासून पेट्रोलची निर्मिती करता येते. या प्रक्रियांचा उपयोग करुन प्लॅस्टिकला रिसायकल करुन त्यापासून डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधनही तयार करता येते.” न्यूज 18 ने याबाबत रिपोर्ट केला आहे.

जवळपास 500 किलोग्रॅम नॉन-रिसायकल प्लॅस्टिकपासून 400 लिटर पेट्रोल तयार केले जाऊ शकते. या निर्मितीत पाण्याचीही आवश्यकता नाही. तसेच यात कोणत्याही प्रकारचे प्रदुषित पाणीही बाहेर पडत नाही. ही प्रक्रिया पर्यावरणपूरक असून त्यामुळे हवा प्रदुषणही होत नसल्याचा दावा सतीश कुमार यांनी केला आहे.

सतीश कुमार यांनी खराब प्लॅस्टिकला रिसायकर करुन 2016 रोजी 50 टन पेट्रोल बनवले होते. सध्या कुमार यांची कंपनी दररोज 200 किलोग्रॅम प्लॅस्टिकपासून 200 लीटर पेट्रोल तयार करते. हे पेट्रोल स्थानिक कंपन्यांना अवघ्या 40 ते 50 रुपयांना विकले जाते आहे.

सतीश कुमार यांनी आपल्या कंपनीच्या उद्देशांबद्दल बोलताना सांगितले, “पर्यावरणाचे रक्षण करणे हाच ही कंपनी सुरु करण्यामागे उद्देश होता. यातून कोणताही व्यवसायिक लाभ होईल, अशी आम्हाला मुळीच कल्पन नव्हती. आपलं भविष्य स्वच्छ रहावे हीच आमची एक छोटी इच्छा आहे. जर कुणाला या तंत्रज्ञानाच रस असेल आणि ते याचा उपयोग करणार असतील, तर आम्ही आमचं हे तंत्रज्ञान कोणत्याही उद्योजकाला देऊ.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.