हैदराबाद: वाढत्या ट्राफिकमुळं रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण हैदराबादच्या एका ट्राफिक पोलिसाने असं काही केलं की सोशल मीडियावर सध्याच त्याचीच चर्चा सुरु आहे. एका रुग्णवाहिकेला ट्राफिकमधून वाट करुन देण्यासाठी हा पोलीस कर्मचारी तब्बल 1 किलोमीटर धावला. जी बाबजी या ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याला त्याने बजावलेल्या कर्तव्यासाठी असं एक बक्षिस मिळालं की ते बक्षिसही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Hyderabad Traffic Police personnel G.Babji ran more than a kilometre to clear traffic for an ambulance)
4 नोव्हेंबरला हैदराबादेतील एबिड्स पासून कोटीच्या दिशेनं एक रुग्णवाहिला निघाली होती. पण रस्त्यावरील ट्राफिकमुळे रुग्णवाहिकेला रस्ताच मिळत नव्हता. त्यावेळी कर्तव्य बजावत असलेल्या ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हे पोलीस कर्मचारी तातडीने रुग्णवाहिकेसमोर आले आणि त्यांनी रस्ता मोकळा करुन देण्यास सुरुवात केली. तब्बल 1 किलोमीटर धावत जात या पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णवाहिकेला जागा मोकळी करुन दिली.
#WATCH Hyderabad Traffic Police personnel G.Babji ran more than a kilometre to clear traffic for an ambulance carrying a patient during peak traffic hours yesterday pic.twitter.com/Kkx5PxOVij
— ANI (@ANI) November 5, 2020
पोलीस कॉन्स्टेबल जी. बाबजी यांची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा सुरु आहे. त्याचबरोबर त्यांच्या परिवाराकडूनही त्यांना एक खास बक्षिस मिळालं. त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना कर्तव्य बजावताना पाहिल्यानंतर स्वत:च्या हाताने एक कार्ड बनवून दिलं. हे कार्ड आपल्या वडिलांना देण्यासाठी ती रात्री उशिरापर्यंत जागी राहिली.
Hyderabad Police constable #GBabji who ran for 2 kms to make way for an ambulance was felicitated by @hydcitypolice
His 7 year old daughter waited for him till 11 pm to hug him & congratulate him with this!
Can any thing be more beautiful than this??
PC: Newsmeter pic.twitter.com/RoFXAvNe9Z— Priyanka Shukla (@PriyankaJShukla) November 6, 2020
आपल्या वडिलांना हे खास बक्षिस देणाऱ्या चिमुकलीचंही सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरु आहे. त्या चिमुकलीने दिलेलं हे बक्षिस आजवर एखात्या मुलीने आपल्या वडिलांना दिलेलं सर्वात खास बक्षिस असल्याचं लोक म्हणत आहेत.
पदभार स्वीकारताच पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धडाका, आठ वर्ष जुन्या हत्याकांडातील आरोपी गजाआड
पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार
Hyderabad Traffic Police personnel G.Babji ran more than a kilometre to clear traffic for an ambulance