स्पोर्टी लूक, पावरफुल इंजिन, Hyundai ची नवी i10 N Line

Hyundai ने नवीन स्पोर्टी कार i10 N Line आणली आहे. कंपनीने या गाडीला 2019 च्या Frankfurt Motor Show मध्ये दाखवलं. ही नवीन गाडी थर्ड-जेनरेशन i10 (यूरोपिअन मॉडेल)चं स्पोर्टी व्हर्जन आहे (Hyundai i10 N Line look revealed).

स्पोर्टी लूक, पावरफुल इंजिन, Hyundai ची नवी i10 N Line
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 2:00 PM

मुंबई : Hyundai ने नवीन स्पोर्टी कार i10 N Line आणली आहे. कंपनीने या गाडीला 2019 च्या Frankfurt Motor Show मध्ये दाखवलं. ही नवीन गाडी थर्ड-जेनरेशन i10 (यूरोपिअन मॉडेल)चं स्पोर्टी व्हर्जन आहे (Hyundai i10 N Line look revealed). भारतात नुकतीच लाँच झालेली Grand i10 NIOS ही यूरोपिअन मार्केटची थर्ड-जेनरेशन i10 आहे. मात्र, युरोपनुसार यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Hyundai i10 N Line मध्ये इंजिनसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. एक 1.2-लीटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 bhp पावर आणि 112 Nm पीक टॉर्क जेनरेट करतं. हे इंजिन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणाऱ्या i10 आणि भारतातील Grand i10 Nios मध्ये देण्यात आलं आहे. त्याशिवाय, दूसरं 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे 99hp पावर आणि 172Nm टॉर्क जनरेट करतं. टर्बोचार्ज्ड इंजिन असलेलं मॉडेल i10 चं आतापर्यंतच सर्वात पावरफुल व्हेरिएंट असेल.

Hyundai i10 N Line मध्ये नवीन बंपर, नवीन डिजाईनचं ग्रील, 16-इंचाचे अलॉय व्हील्ज आणि अँग्युलर एलईडी डेटाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. यामुळे ही Hyundai i10 N Line इतर गाड्यांपेक्षा वेगळी आहे. शिवाय, स्पोर्टी लूक असलेल्या या गाडीत रिअर स्कीड प्लेट आणि डिफ्यूजरही आहे. या गाडीत स्टिअरिंग व्हिल आणि गिअर-शिफ्ट लीव्हरवर ‘N’ ब्रँडिंग, मेटल पेडल्स आणि अपग्रेडेड सीट्स देण्यात आल्या आहेत.

Hyundai या स्पोर्टी लूक असलेल्या i10 N Line ला युरोपमध्ये पुढील वर्षी बाजारात उतरवेल. कंपनी भारतीय बाजारातही स्पोर्टी N Line आणण्याच्या विचारात आहे. त्यामुळे भारतातही Hyundai i10 N Line लाँच होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही गाडी Hyundai चं चौथं N Line मॉडेल आहे. यापूर्वी कंपनीने i30 हॅचबॅक, i30 फास्टबॅक आणि टूसॉनचं N Line मॉडेल बाजारात आणलं आहे.

संबंधित बातम्या :

Tata Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल Kraz लाँच, किंमत तब्बल…

नवीन Maruti Brezza लवकरच लाँच होणार, पाहा खास फीचर्स

Renault ची MPV Triber लाँच, किंमत फक्त…

Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.