ह्युंडाईची नवीन कार लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

ह्युडांईने आपली नवीन कार Grand i10 NIOS आज (20 ऑगस्ट) लाँच केली आहे. नवीन कार लाँच केल्यामुळे कंपनी आपले जुने मॉडल Grand i10 बंद करणार नाही. याचा अर्थ दोन्ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असणार आहेत.

ह्युंडाईची नवीन कार लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Aug 20, 2019 | 6:55 PM

मुंबई : ह्युडांईने आपली नवीन कार Grand i10 NIOS आज (20 ऑगस्ट) लाँच केली आहे. नवीन कार लाँच केल्यामुळे कंपनी आपले जुने मॉडल Grand i10 बंद करणार नाही. याचा अर्थ दोन्ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असणार आहेत. या दोन्ही कार 4 व्हेरिअंटमध्ये (Era, Magna, Sportz, Asta) उपलब्ध आहेत. Grand i10 NIOS आणि Grand i10 च्या सुरुवाती किंमतीत जास्त अंतर नाही. पण लुक ते फीचरपर्यंत दोन्ही कारमध्ये फरक आहे.

मायलेज

ग्रँड आय 10 नियोसच्या पेट्रोल इंजिनचा मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 20.7 किमी प्रती लीटर आहे. डीझेल इंजिनचा मायलेज मॅन्युअल 26.2 किमी प्रती लीटर आहे. तर ग्रँड आय 10 पेट्रोल इंजिनचा मायलेज 18 किलोमीटर आणि डिझेल इंजनचा मायलेज 23 किमी प्रती लीटर आहे.

फीचर्स

दोन्ही कारमध्ये पॉवर स्टेअरिंग, रिअर एसी वेन्ट्स, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर्स, कूल्ड ग्लव्ह बॉक्स आणि हाईट अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट्ससारख्या फीचर्सचा समावेश आहे. ग्रँड आय नियोसमध्ये वायरलेस फोन चार्जर सुविधाही दिली आहे. ही सुविधा जुन्या कारमध्ये नाही.

इंजिन

दोन्ही कारमध्ये 83 PS पॉवरचे 1.2 लीटर पेट्रोल आणि 75 PS पावरचे 1.2 लीटर डीझेल इंजिन दिले आहे. जुन्या मॉडलमध्ये तुम्हला सीएनजीचा पर्याय मिळतो. पण नवा मॉडल Grand i10 NIOS मध्ये सीएनजीचा पर्याय नाही. नवीन कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय दिला आहे. जुन्या मॉडल म्हणजे ग्रँड आय 10 मध्ये दोन इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आहे. तर 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय फक्त पेट्रोल इंजिनला दिला आहे.

किंमत 

नवीन Grand i10 NIOS ची किंमत 5 लाख रुपय ते 7.99 लाख रुपयांच्यामध्ये आहे. तर Grand i10 ची सुरुवाती किंमत 4.98 लाख ते 7.63 लाख रुपयांच्यामध्ये आहे.

लूक

नवीन कारमध्ये शार्प प्रोजेक्टर हेड लॅम्प्स, केसकेडिंग ग्रिल, ग्रिलच्या कॉर्नरला व्ही आकारात एलईडी डीआरएल, बंपरवर अग्रेसिव्ह लाईन्स, फॉग लॅम्प्स, डायमंड कट अलाय व्हील्ज, क्रोम डोअर हँडल दिला आहे. त्यामुळे ही या कारचा लूक शानदार वाटत आहे.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.