Supriya Sule | मी मेरिटवर मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. 'मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास होयच..असं कॉपी करून पास नाही होणार, मै सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी' अशा शब्दांत त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांना टोला हाणला.
पुणे | 26 फेब्रुवारी 2024 : ‘ मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. ‘मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैे सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांना टोला हाणला. बारामतीमध्ये सध्या सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. नणंद vs भावजय हा संघर्षही वाढला आहे. एका सभेदरम्यान बोलताना सुप्रिया सुळे यांनी कोणाचंही नाव न घेता भरपूर टोलेबाजी केली. मात्र त्यांचा इशारा कोणाच्या दिशेला होता, हे सर्वांनाच समजलं.
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार आणि इतर काही नेते भाजपसोबत सत्तेत गेले आणि राष्ट्रवादीला खिंडार पडलं. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवदी पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासूनच शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात वाक् युद्ध पहायाल मिळत असून लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा हा संघर्ष तीव्र होताना दिसतोय. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातही गेल्या काही दिवसांपासून खडाजंगी होताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदार संघ पिंजून काढत आहेत. त्याचदरम्यान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. त्यालाच सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
पुण्यातील वडगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत, त्यांनाच टोला हाणला. ‘ मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते. मतं मागायला मी जाते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या अजित पवारांना सुनावलं.
लोकसभा निवडणूक लढायच्या दोन वर्ष आधीपासून मी मतदार संघांचे दौरे करत होते. दोन वर्षात मी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलाय. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैं सुप्रिया सुळे हू..खुद करुंगी और खुद पास हुंगी.. असा खोचक टोलाही त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना उद्देशून लगावला. एकंदरच बारामतीमध्ये वातावरण तापलं असून नणंद वि. भावजय हा संघर्ष येत्या काळाता तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.
‘आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला’
यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला हाणला होता. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळे यांना पाठवते. ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे. नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. कॅन्टीनमध्ये बसावं लागतं, असा जळजळीत टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला होता.