पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास ‘लव जिहाद’वर कायदा करणार : खासदार लॉकेट चटर्जी

भाजप महासचिव लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) यांनी 2021 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद (Love Jihad) विरोधात कायदा तयार करु, असा दावा केलाय.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास ‘लव जिहाद’वर कायदा करणार : खासदार लॉकेट चटर्जी
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 7:33 PM

कोलकाता : उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने सत्ता काबिज केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे. भाजप खासदार आणि पश्चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) यांनी 2021 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद (Love Jihad) विरोधात कायदा तयार करु, असा दावा केलाय. तसेच लव जिहादवर बंदी घालू, असंही म्हटलंय. याआधी विश्व हिंदू परिषदेने (VHP) पश्चिम बंगाल लव जिहादच्या प्रकरणांमध्ये टॉप राज्यांपैकी एक असल्याचा आरोप केला होता (If BJP government comes in West Bengal will make laws on Love Jihad claim MP Lockett Chatterjee).

पश्चिम बंगालमध्ये एका आंतरधर्मीय लग्न केलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. या प्रकरणी भाजप खासदार लॉकेट यांनी आज (20 नोव्हेंबर) पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या मृत्यूला जबाबदार दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. लॉकेट यांनी आरोप केला आहे की, “बेहला भागातील हरिदेवपूर स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात एका मुस्लीम व्यक्तीने हिंदू मुलीला फसवून लग्न केलं. ती गर्भवती राहिल्यावर तिची हत्या केली.”

पश्चिम बंगालमधील मुलांना अशाचप्रकारे फसवण्यात येत आहे. पीडित तरुणी देखील अशाचप्रकारे लव जिहादचा बळी असून तिची हत्या झाल्याचा आरोप खासदार लॉकेट यांनी केलाय. लॉकेट चटर्जी म्हणाल्या, “पोलिसांनी एफआयआर करुन जबरदस्तीने पीडितेच्या आई वडिलांना सही करायला लावली. पीडितेच्या आई वडिलांनी एफआयआर (FIR) दाखवण्याची मागणी केली, तर त्यांना नकार देण्यात आला. पोलिसांचं वर्तन बदललं नाही, तर आम्ही पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलनाला बसू.”

संबंधित बातम्या :

मेहबूबा मुफ्तींसोबतची भाजपची युती ‘लव जिहाद’ होता का? शिवसेनेचा भाजपला सवाल

महाराष्ट्रात ‘लव जिहाद’ची प्रकरणं वाढल्याचं ट्विट, टीकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण

तनिष्क वाद: जाराकडून राहुलसोबतच्या लग्नाचा फोटो ट्विट, शशी थरुर म्हणाले हाच आहे ‘इन्क्लुझिव्ह इंडिया’

संबंधित व्हिडीओ :

If BJP government comes in West Bengal will make laws on Love Jihad claim MP Lockett Chatterjee

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.