पाकिस्ताननेही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेले नाहीत : मेहबुबा मुफ्ती
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्तींचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळून आलंय. भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या दर्पोक्तीला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्तींचं पाक प्रेम दिसून आलं. पाकिस्ताननेही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेले नाहीत, असं वक्तव्य मुफ्तींनी केलं. राजस्थानमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी […]
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्तींचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळून आलंय. भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या दर्पोक्तीला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्तींचं पाक प्रेम दिसून आलं. पाकिस्ताननेही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेले नाहीत, असं वक्तव्य मुफ्तींनी केलं.
राजस्थानमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानच्या धमक्यांना उत्तर दिलं होतं. पाकिस्तानकडून सातत्याने आमच्याकडे अणुबॉम्ब असल्याची भारताला आठवण करुन दिली जाते. पण भारताकडेही अणुबॉम्ब आहेत आणि ते आम्ही दिवाळीसाठी ठेवेलेले नाहीत, असं उत्तर मोदींनी दिलं होतं. आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं आणि त्रास इकडे झाला, असा टोलाही मोदींनी लगावला होता.
If India hasn’t kept nuclear bomb for Diwali, it’s obvious Pakistan’s not kept theirs for Eid either. Don’t know why PM Modi must stoop so low & reduce political discourse to this.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) April 22, 2019
मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्तींनी टीका केली. भारताने दिवाळीसाठी बॉम्ब ठवलेले नसतील, तर पाकिस्ताननेही ईदसाठी अणुबॉम्ब ठेवलेले नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं. शिवाय मोदींच्या भाषणाची पातळी घसरली असल्याची टीकाही मुफ्तींनी केली.
मोदींनी राजस्थानमधील सभेत काँग्रेसवर टीका केली होती. 1971 च्या युद्धात जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची चांगली संधी काँग्रेसने गमावली, असं ते म्हणाले होते. आजचा भारता विना युद्धाचा पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना मारत आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण केली, असं मोदी म्हणाले होते.
पाकिस्तानला मिळालेल्या सुटीमुळे देशात दहशतवादी हल्ले ही एक सर्वसामान्य बाब होती. पण तुमच्या एका मतामुळे हे हल्ले कमी झाले आहेत. आम्ही पाकिस्तानची सगळी गुरमी उतरवली आहे. कटोरा घेऊन त्यांना जगभरात फिरण्यासाठी मजबूर केलंय. आमच्या सरकारमध्येच भारत त्या देशांच्या रांगेत सहभागी झाला, ज्यांच्याकडे जमीन, पाणी आणि हवेतून आण्विक हल्ला करण्याची क्षमता आहे, असं मोदी म्हणाले होते.