“उदयनराजे बिनडोक ठरत असतील, तर निम्मा देश बिनडोक ठरेल”
खासदार उदयनराजे भोसले यांना बिनडोक म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. “एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात” अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंवर टीका केली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (If Udayanraje Bhosale is mad then half of the country is mad says Anand Dave)
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. दवे म्हणाले की, जातीय आरक्षण रद्द करा अशी मागणी केली म्हणून जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल. प्रकाश आंबेडकरांना उदयनराजेंचं मत पटलेलं नसेल तर त्यांनी आरक्षणाबाबत जनमत घ्यावे.
दवे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना लोकभावनेचा अनुभव घ्यायचाच असेल तर संपूर्ण देशभरात एकदा आरक्षणावर मतदान मतदान घेण्याची मागणी त्यांनी करावी, आम्ही त्यास पाठिंबा देऊ. आरक्षणाच्या चतकोर भाकरीने, त्यावर खेळल्या गेलेल्या राजकारणाने, कायदेशीर लढाईने आजचा युवक चिंताग्रस्त झाला आहे. आरक्षण कोणाचेही, कोणतेही समाधान करण्यात अपयशी ठरलं आहे. अशावेळी जनतेत जाऊनच आता लोकांची मते तपासावी. आम्हाला खात्री आहे की, निम्म्यापेक्षा जास्त नागरिक जातीय आरक्षणाच्या विरोधातच मतदान करतील.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय”.
तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही”.
व्हिडीओ पाहा
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘सुरेशदादा पाटील यांच्याशी आमचं बोलणं झालं. 10 ऑक्टोबरच्या मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण वेगळं आणि ओबीसी आरक्षण वेगळं, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करु नका, अशी विनंती आम्ही त्यांना केली.
सामंजस्य बिघडताना दिसत असल्याने आम्ही पाठिंबा जाहीर केला. आरक्षण संघर्ष समिती किंवा इतरांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती आहे. फाटे फोडण्याचा प्रयत्न करुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता आहे. त्यातून आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील सामंजस्य बिघडू नये, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा : प्रकाश आंबेडकर https://t.co/ZgbSAF7a8M pic.twitter.com/GR4q04KRXs
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
संबंधित बातम्या
मराठा समाजाच्या 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान, गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलीची सनद रद्द करा, विनायक मेटे आक्रमक
आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम
(If Udayanraje Bhosale is mad then half of the country is mad says Anand Dave)