Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल : बाळासाहेब सराटे

मुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मराठा समाजाला डिवचू नका, अन्यथा कोर्टात गेलो आणि केस केली तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब सराटे यांनी […]

... तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल : बाळासाहेब सराटे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मराठा समाजाला डिवचू नका, अन्यथा कोर्टात गेलो आणि केस केली तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब सराटे यांनी मराठा आणि ओबीसी या वादावरही भाष्य केलं. त्याचवेळी मराठा समाजाला डिवचू नये, असा इशाराही दिला.

“मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही आणि त्यावर डाग लागला, तर या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी झाली तर हे सगळं आरक्षण रद्द होऊ शकतं. ते बेकायदेशीर आहे.. बोगस आणि तोतया ओबीसी आहेत यामध्ये. उदाहरणार्थ 1967 साली पहिलं आरक्षण लागू झालं. कोणताही अहवाल नव्हता. काहीही नव्हतं. तरी 180 जाती ओबीसी घातल्या. एका ओळीच्या जीआरने माळी जात ओबीसीमध्ये गेली आणि नंतर इतर जाती ओबीसीमध्ये गेल्या. पण मराठ्यांचं नाव आलं की यांचं पित्त खवळतं. आजपर्यंत यांनी 50 वर्ष आरक्षणावर डल्ला मारला. यांना घटनेने कोणताही अधिकार नाही. तरीही मराठा समाजाला का चिडवताय? मराठा समाजाने डोकं लावून केस केली तर यांचं सगळं आरक्षण रद्द होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्हाला दोन वर्गांमध्ये भांडण लावायचं नाही. तुम्ही 50 वर्ष आरक्षण घेतलं, अजून 200 वर्ष घ्या, पण मराठा समाजाला त्यातलं काही मिळावं अशी आमची मागणी आहे. ओबीसीबद्दल जास्त टीका करणार नाही, त्यांनी या भानगडीत पडू नये, नाहीतर त्यांच्या चार-दोन बिनडोक लोकांमुळे सगळं आरक्षण निघून जाईल,” असा इशारा बाळासाहेब सराटे यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ असं सांगितलंय. मग ओबीसी लोकांच्या मनासारखं झालंय तर त्यांनी फटाके वाजवायला पाहिजेत. कोण ते हरीभाऊ रठोड आहेत, कोकरे की बोकरे नाव माहित नाही, ते पण ओरडतायत. आयोगावर कमेंट करत आहेत. बापट आयोगाने सहा मीटिंग केल्या आणि सहा पानाचा अहवाल दिला. तरी तो आयोग चांगला म्हणत होते. या आयोगाने एवढा मोठा अहवाल दिलाय. त्याच्यावर बिनडोक लोक बोलत आहेत, असा आरोप बाळासाहेब सराटे यांनी केला.

ओबीसीच्या लोकांनी दुटप्पीपणा सोडायला हवा. व्हीजेएनटीमधले कोकरे किंवा बंजारा समाजातले राठोड हे यावर बोलत आहेत. त्यांना मराठा समाजावर बोलण्याचा अधिकार नाही. ते 50 वर्षांपासून आरक्षण घेत आहेत. त्यांच्या आरक्षणावर आम्ही कधीही बोललेलो नाही. ओबीसीचा जो कोटा आहे, त्यात चार दोन टक्के मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी मागणी आहे. हा समाज ताकदवर आहे, हा समाज पेटून उठला तर मोठा हाहाःकार होण्याची शक्यता आहे. तरी आम्ही समजावून सांगतोय आणि शांततेने मागतोय, असं बाळासाहेब सराटे म्हणाले.

आयोगाने मोठा डेटा गोळा करुन अहवाल दिलाय. याबद्दल मराठा समाज समाधानी आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल गेल्यानंतर त्याचा कचरा झालाय. कायद्यानुसार मराठा समाज 50 टक्क्याच्या आतल्या आरक्षणासाठी पात्र आहे. वेगळ्या प्रवर्गात आरक्षण म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान सरकारने केलाय, असं बाळासाहेब सराटे म्हणाले.

राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिलाय, त्यातले सरकारने फक्त तीन मुद्दे समोर आणले. आयोगाने ओबीसीत आरक्षण द्या म्हणून सांगितलेलं नाही. घटनेतच ओबीसी शब्द नाही. मग आयोग कसा ओबीसी म्हणेल? आयोगाने त्यांचं काम चोख केलं आहे. सरकार समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोप बाळासाहेब सराटे यांनी केला.

कोण आहेत बाळासाहेब सराटे?

बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

त्यांनी मराठा आरक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

त्यांनी अनेक वर्ष मराठा आरक्षणाच्या तांत्रिक बाबी मांडल्या.

मात्र बाळासाहेब सराटेंवरच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.

आरक्षण सर्व्हेचं काम सराटेंच्या एजन्सीला दिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला होता.

सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाने केला होता.

पाहा बाळासाहेब सराटे काय म्हणाले?

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.