Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही मोबाईल अ‍ॅपमधून कर्ज घेतलंय? तुमचा छळ होतोय? सावध करणारी ही बातमी तुमच्यासाठी!

अनेकजण मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून हल्ली कर्ज घेतात. अ‍ॅपवर काही माहिती भरल्यानंतर काही कागदपत्रांचे फोटो सबमिट करताच या अ‍ॅपद्वारे कर्ज मिळतं.

तुम्ही मोबाईल अ‍ॅपमधून कर्ज घेतलंय? तुमचा छळ होतोय? सावध करणारी ही बातमी तुमच्यासाठी!
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 8:08 PM

मुंबई : अनेकजण मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून हल्ली कर्ज घेतात. अ‍ॅपवर काही माहिती भरल्यानंतर काही कागदपत्रांचे फोटो सबमिट करताच या अ‍ॅपद्वारे कर्ज मिळतं. परंतु हे कर्ज वेळेत फेडलं नाही तर त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हैदराबादमध्ये राहणाऱ्या व्ही. कविता या महिलेला पैशांची तातडीची गरज होती. कोरोना काळात त्यांना पैसे मिळवणं अवघड झालं होतं. त्यांना कर्जदेखील मिळत नव्हतं. त्याचदरम्यान त्यांना कोणीतरी कर्ज देणाऱ्या एका अ‍ॅपविष्यी माहिती दिली. त्यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड करुन कर्ज मिळवलं. काहीच मिनिटात त्यांना पैसे मिळाले. परंतु, त्यांना वेळेत कर्जफेड करता आली नाही. (If You have taken loan from a mobile app, You need to be careful)

कर्ज फेडण्यासाठी अ‍ॅपद्वारे त्यांना जी मुदत दिली होती. त्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी सकाळी 7 वाजता अॅपच्या कॉल सेंटरवरून कविता यांना फोन आला. परंतु कामात असल्याने त्यांनी तो फोन उचलला नाही. त्यानंतर काही मिनिटात कॉल सेंटरवरील लोकांनी कविताच्या वहिनीला फोन केला. फोन करणाऱ्याने कविता यांच्या वहिणीला विचारले की, तुम्ही कविताला ओळखता का? त्यावर त्या हो म्हणाल्या. त्यावर फोन करणारी व्यक्ती म्हणाली की, कविताने आमच्याकडून कर्ज घेतलं आहे आणि रेफरन्स म्हणून तुमचा नंबर दिला आहे. त्यामुळे आता तिचं कर्ज तुम्ही फेडा. हे ऐकल्यानंतर कविताच्या वहिनी घाबरल्या. त्यांनी झाला प्रकार घरच्यांना सांगितला. कविता आणि त्यांच्या वहिणीमध्ये फार जवळचे नाते किंवा जवळचे संबंध नव्हते. परंतु अॅपच्या लोकांनी तिला फोन करुन धमकावल्याने कविताच्या वहिणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कविताशी संबंध तोडले.

अ‍ॅप्सशी संबंधित लोकांच्या जाचाला कंटाळून अनेक जणांच्या आत्महत्या

कर्ज देणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर आकरलं जाणारं अव्वाच्या सव्वा व्याज, धमक्या, असभ्य भाषा आणि शिविगाळ यामुळे कर्ज घेणाऱ्याला जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात. अशा काही अ‍ॅपच्या फसवेगिरीमुळे, धमकावल्यामुळे लोकांना शिविगाळ केल्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्ज देणाऱ्या या संस्था किंवा अॅप्स कोणतीही शहानिशा न करता अगदी सहज आणि तात्काळ कर्ज देतात. कर्ज घेणाऱ्याकडून मात्र मोठी रक्कम उकळतात. कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यास जरादेखील विलंब केला तर त्याला शिविगाळ केली जातेच सोबत मानसिक त्रासदेखील दिला जातो. हा त्रास इतका जास्त असतो की काही जण थेट मृत्यूलाच जवळ करतात.

कर्ज मिळवणं सोप्पं, फेडणं अवघड

या अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर जितक्या सहज आणि पटकन कर्ज मिळतं तितक्या सहज ते फेडणं शक्य नसतं. कारण या कंपन्या बँकांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक व्याज आकारतात. तसेच जीएसटीसह इतर टॅक्सेसची लेबलं लाऊन अधिक पैसे आकारतात. अशा वेळी अगदी काही दिवसात, महिन्यात जरी कर्ज फेडायचे ठरवले तरी मुद्दलीपेक्षा व्याज काही पटींनी अधिक असतं. त्यामुळे लोकांनी अशा अॅप्सची शहानिशा करुनच कर्ज घ्यावं. किंबहुना अशा अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेणं टाळायला हवं.

दुप्पट पैशांची आकारणी

बँका, सहकारी बँका, पतसंस्थां किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमधून कर्ज घेतलं तर या संस्था 100 रुपयांमागे दर महिन्याला 1 रुपया किंवा जास्तीत जास्त 1.50 रुपयांपर्यंत व्याज आकारतात. म्हणजे अगदी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर महिन्याला 5 हजार रुपये व्याज द्यावं लागतं. परंतु जर तुम्ही अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेत असाल. तर ही रक्कम 15 ते 20 हजारांहून अधिक असतेच. सोबतच त्यांचे अनेक प्रकारचे टॅक्सही जोडले जातात. उदा. जर तुम्ही अॅप्सच्या माध्यमातून 5 हजार रुपयांचां कर्ज घेताय तर त्यावर प्रोसेसिंग फीस 4 हजार रुपये आकारली जाते. सोबत किमान पाच टक्के महिन्याचं व्याज (अंदाजे पाच टक्के, या कंपन्या याहून अधिक व्याज आकारतात) म्हणजेच 250 रुपये व्याज. त्यामध्ये ते जीएसटीच्या नावाखाली 5 ते 8 टक्के अजून व्याज आकारतात. म्हणजेच ते 250 ते 400 रुपये. दरम्यान, जीएसटीच्या नावाखाली आकारलेले पैसे हे लोक सरकारकडे जमा करत नाहीत. कारण त्यासाठी कर्जाची कोणतीही नोंदणी केलेली नसते. सोबतच इतर काही वेगळ्या प्रकारची शुल्क आकारणी केली जाते. त्यामुळे साधारणतः तुम्ही पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले तर एका महिन्यात तुमच्याकडून ते 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक पैसे वसूल करतात. उदा. मुद्दल 5 हजार रुपये + प्रोसेसिंग फिस 4 हजार रुपये + व्याज 250 रुपये + जीएसटी 400 रुपये = 9 हजार 650 + इतर शुल्क)

खोट्या नोटीसांची धमकी आणि नातेवाईकांमध्ये नचक्की

कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाला तर या कंपन्या कर्जदाराच्या मोबाईलवर खोट्या लीगल नोटिसा पाठवतात. तुम्ही कर्ज फेडलं नसल्यामुळे तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू किंवा करत आहोत आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टात हजर रहावं लागेल, अशा प्रकारचा आशय या नोटिशींमध्ये लिहिलेला असतो. या सगळ्या नोटिसा बनावट असतात. कर्जदाराला घाबरवण्यासाठी हे सर्व काही केलेलं असतं. या नोटिसा ते कर्जदारासह त्याच्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवतात. याबाबतची कर्जदाराशिवाय इतर कोणालाही कल्पना नसते. अशा वेळी लोक घाबरतात. तसेच या नोटिसांमुळे नातेवाईक आणि मित्र परिवरांमामध्ये कर्जदाराची नाचक्की होते. यातूनच कर्जदाराचे मानसिक खच्चीकरण होते. त्याचदरम्यान अॅपच्या लोकांकडून छळ आणि शिविगाळ सुरुच असते. अशा परिस्थितीत कर्जदार आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचलतात.

अ‍ॅप्सच्या माध्यमातून कर्ज घ्यावं का?

रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत असणाऱ्या बँका, बँकासह वित्तीय संस्था (non-banking fanancial organizations-NBFO) आणि वेगवेगळ्या राज्यांच्या नियमानुसार कार्यरत असणाऱ्या संस्था, यांनाच कर्जपुरवठा करण्याची अधिकृत परवानगी आहे. त्यामुळे या अॅप्सच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांचं बँकग्राउंड व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. हे अॅप्स बँकांशी अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेशी संबंधित नसतील तर त्याद्वारे कर्ज घेऊ नये.

हेही वाचा

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला सर्वात मोठी खुशखबर

Happy New Year 2021 : नवीन वर्षात घराचं अर्थकारण सांभाळायचं असेल तर ‘हे’ नक्की वाचा!

(If You have taken loan from a mobile app, You need to be careful)

लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.