पाकिस्तानातून कांद्यांची आयात, स्थानिक शेतकरी संतप्त

राज्यात कांद्याचे दर (Onion Rate) वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा (Pakistan Onion) आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर स्थानिक शेतकऱ्यांमधून (Indian Farmers) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानातून कांद्यांची आयात, स्थानिक शेतकरी संतप्त
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 3:39 PM

मुंबई: राज्यात कांद्याचे दर (Onion Rate) वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा (Pakistan Onion) आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर स्थानिक शेतकऱ्यांमधून (Indian Farmers) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच योग्य दर नसल्याने शेती तोट्यात आहे. त्यात आता कुठं कांद्याचे दर वाढले आहेत, तर सरकार बाहेरुन कांदा आयात (Import of Onion) करत आहे. सरकारसाठी पाकिस्तानपेक्षा भारतीय शेतकरी जास्त मोठे शत्रू वाटत आहेत का? असा थेट सवाल राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी विचारला आहे.

सरकारी नियंत्रण असलेली संस्था धातू आणि खनिज व्यापार महामंडळ (MMTC) संस्थेने पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांमधून स्वस्तात कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. शेतकऱ्यांचे खरिप पीक अवघ्या एक महिन्यात बाजारात येणार असताना सरकार आयात कशी करु शकते, असाही प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “एमएमटीसीच्या 6 सप्टेंबरच्या निवेदेप्रमाणे कांद्याची आयात होण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत थांबावे लागणार आहे. त्याच काळात स्थानिक शेतकऱ्यांचाही माल बाजारात येईल. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे दर कोसळतील.”

मागील काही काळात कांद्याचे दर कमी राहिल्याने शेतकऱ्यांना बरेच नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना कांद्याची साठवण देखील केली. आता कुठं चांगले दर मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र, सरकारच्या कांदा आयातीच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

कांद्याचे दर काय?

नाशिकमधील लासलगाव कांदा बाजारात कांद्याचे दर प्रतिक्विंटल 2,300 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. प्रमुख शहरांमध्ये हाच कांदा प्रतिकिलो 39-42 रुपये किलोने विक्री केला जात आहे. हेच दर एप्रिलमध्ये कांद्याचे दर 830 रुपये प्रतिक्विंटल आणि मे महिन्यात 931 रुपये इतके होते. जूनमध्ये हे दर वाढून 1,222 रुपये, जुलैमध्ये 1,252 आणि ऑगस्टमध्ये 1,880 रुपये होते. सप्टेंबरमध्ये कांद्याचा सरासरी दर 2,377 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.