वाफेवर चालणारे टर्बाईन : इ. स. 1629 साली जिजाबाई गरोदर होत्या. याच काळात इटलीमध्ये अभियंता जिओवाना ब्रांका यांनी वाफेवर चालणाऱ्या टर्बाईनचा शोध लावला.
माईक्रोमिटर : इ. स. 1636 मध्ये बाल शिवबा आई जिजाऊ साहेबांचे बोट धरून पुणे जहागिरीमध्ये आले. तेव्हा इंग्लडमध्ये खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ गॅसको ने यांनी माईक्रोमिटरचा शोध लावला.
पास्कलाईन् : इ. स. 1642 मध्ये बाल शिवबाराजे बंगळुरात पिता शहाजीराजेंसोबत होते. तेव्हा फ्रांसमधील गणितज्ञ ब्लेज पास्कल यांनी आकडेमोड करणारे यंत्र विकसित केले.
बॅरोमिटर : इ. स. 1643 मध्ये शिवबा बंगळुरातून लग्न आटोपून पुण्यात आले. त्याच काळात इटलीमधील गणितज्ञ इव्हनजेलिस्ता टोरीसिलीने बॅरोमिटरचा शोध लावला. या यंत्राच्या साहाय्याने हवेतील दाब मोजता येऊ लागला.
एअर पंप : इ. स. 1650 मध्ये शिवरायांना वयाच्या 20 व्या वर्षी कन्यारत्न झाले. त्याच वर्षी युरोपमध्ये ऑटो वोन ग्यूरिकने हवा खेचून घेणाऱ्या पंप शोधला होता.
लोलक घड्याळ : इ. स. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तेव्हा जर्मनीमध्ये ख्रिस्तीअन ह्यूजेन्स शास्त्रज्ञाने लोलक घड्याळाचा शोध लावला. हे आजही घराच्या भिंतीची शोभा वाढवत आहे.
कुक्कु घड्याळ : इ. स 1660 मध्ये महाराजसाहेब पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले. बाजीप्रभू, बांदल देशमुखांच्या बलिदानाने घोडखिंड ‘पावन’ झाली. तेव्हा जर्मनीमध्ये प्रत्येक तासाला एक पक्षी बाहेर येऊन कुक्कु आवाज काढणाऱ्या घड्याळाचे उत्पादन सुरू झाले होते.
प्रतिबिंबित दुर्बीण : इ. स. 1663 साली शिवरायांनी लालमहालात जाऊन शास्ताखानाची बोटे कापली. त्याच काळात युरोपमध्ये गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ जेम्स ग्रेगोरीने जगातील पहिल्या दुर्बिणीचा शोध लावला.
शॅम्पेन् : इ. स. 1670 मध्ये शिवरायांना दुसरे पुत्ररत्न रामराजे झाले. त्याचवेळी फ्रान्सने शॅम्पेन् नावाचे मादक द्रव्य जगाला दिले. त्याची झिंग आजतागायत अबाधित आहे.
जिवाणूचा शोध : इ. स. 1674 साली शिवाजीराजे सिंहासनाधिश्वर छत्रपती झाले. त्यावेळी जर्मनीमधील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँटोंन वँन् ल्युव्हेनहोक यांनी जगात सर्वात प्रथम सुक्ष्मजीवाचा शोध लावला.
खिशातील घड्याळ : इ. स. 1675 मध्ये ख्रिस्तीअन ह्युजेन्स यांनी खिशात अडकवायच्या घड्याळाचा शोध लावला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले फोंडा जिंकून पोर्तुगीजांना शह दिला होता.
प्रेशर कुकर : इ. स. 1679 मध्ये युवराज संभाजीराजे मुघलांच्या गोटातून स्वराज्यात दाखल झाले. तेव्हा फ्रांसमध्ये डेनिस पेपिन्स याने प्रेशर कुकरचा शोध लावला. आज देखील प्रत्येकाच्या घरात प्रेशर कुकर आहे.