Imran Khan | आमिरचा भाचा इम्रान खानचा अभिनयाला रामराम

इम्रान खानने 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारुन मनोरंजन विश्वाचे दरवाजे ठोठावले

Imran Khan | आमिरचा भाचा इम्रान खानचा अभिनयाला रामराम
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:32 PM

मुंबई : ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारा अभिनेता इम्रान खान (Imran Khan) गेल्या काही वर्षांपासून फारसा दिसलेला नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट मामा आमिर खानकडून (Amir Khan) अभिनयाचा वारसा लाभलेल्या इम्रानने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला आहे. इम्रानच्या जवळच्या मित्रानेच याविषयी माहिती दिली. (Imran Khan has quit acting friend Akshay Oberoi confirms)

इम्रान खानने 2008 मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारुन मनोरंजन विश्वाचे दरवाजे ठोठावले. तसं इम्रानचं दर्शन बालकलाकार म्हणून याआधीही घडलं होतं. आमिर खानच्या पहिल्या सिनेमातच त्याच्या भाच्यानेही चुणूक दाखवली होती. ‘कयामत से कयामत तक’ (1988) या सिनेमात आमिरच्या लहानपणीच्या भूमिकेत इम्रान दिसला होता. त्या पाठोपाठ ‘जो जिता वही सिकंदर’मध्येही (1992) इम्रान झळकला.

‘जाने तू…’ मध्ये इम्रान आणि जेनेलिया देशमुख यांचे जय-अदिती चांगलेच भाव खाऊन गेले होते. दोघांची केमिस्ट्री जुळून आल्याने बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने चांगली कमाई केली. नवोदित कलाकारासाठी फिल्मफेअरसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्याने खिशात घातले. त्यावेळी पंचविशीत असलेल्या इम्रानला अनेक सिनेमे ऑफर झाले.

किडनॅप, आय हेट लव्ह स्टोरीज, ब्रेक के बाद, देल्ली बेल्ली, एक मै और एक तू, मेरे ब्रदर की दुल्हन अशा सिनेमात तो दिसला. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये ‘लक’ आजमावलं नाही. कारण कंगना रनौतसोबत 2015 मध्ये आलेल्या निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कट्टी बट्टी’ सिनेमानंतर इम्रान मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही.

अक्षयसोबत मैत्रीचे किस्से

दोन वर्षांपूर्वी ‘मिशन मार्स : कीप वेकिंग इंडिया’ या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनयात इम्रानचं मन रमलंच नाही, असं गुपित त्याचा खास मित्र अक्षय ओबेरॉयने सांगितलं. अक्षय आणि इम्रान हे गेल्या 18 वर्षांपासून खास दोस्त आहेत. किशोर नमित कपूर अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये दोघांनी एकत्रच अभिनयाचे धडे गिरवले. मात्र इम्रानमध्ये कुशाग्र लेखक-दिग्दर्शक दडल्याचं अक्षयला वाटतं. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने मैत्रीचे अनेक किस्सेही सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इम्रान आपल्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन कधी करेल, हे माहिती नाही. मात्र तो पडद्यावर धमाका करेल, कारण त्याला या माध्यमाची चांगली समज आहे आणि तो संवेदनशील आहे, असंही अक्षय ओबेरॉयने सांगितलं.

इम्रान पाल ते इम्रान खान

इम्रान खानचे मूळ नाव इम्रान पाल. त्याचा जन्म अमेरिकेत झाला. त्याचे वडील अनिल पाल हे सॉफ्टवेअर इंजिनिअर. मात्र तो दीड वर्षांचा असतानाच आई-वडिलांचा घटस्फोट झाला. इम्रानची आई नुझत खान ही दिग्दर्शक-निर्माते नासीर हुसैन यांची कन्या, दिग्दर्शक-निर्माते मन्सूर खान यांची बहीण, तर अभिनेता आमिर खानची चुलत बहीण. आईने एकट्याने संगोपन केल्याची जाण ठेवत इम्रानने आईचे ‘खान’ आडनाव लावण्याचा निर्णय घेतला. इम्रानने 2011 मध्ये अवंतिका मलिकसोबत लगीनगाठ बांधली. 2014 मध्ये त्यांची मुलगी इमारा मलिक खान हिचा जन्म झाला.

संबंधित बातम्या :

आक्षेपार्ह व्हिडीओ वादानंतर गर्भवती असल्याच्या चर्चांवर पूनम पांडे म्हणते…

लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या Suraj Pe Mangal Bhari चित्रपटाची Box Office वर जादू

(Imran Khan has quit acting friend Akshay Oberoi confirms)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....