Pakistan : इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता, अचानक 50 मंत्री गायब, पाकिस्तानात राजकीय भूकंप?
पाकिस्तानात राजकीय भूकंप होण्याच्या मागे असून पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत.
दिल्ली : पाकिस्तानात (Pakistan) राजकीय भूकंप होण्याच्या मागे असून पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. 8 मार्चला विरोधकांनी (opposition) इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. आता क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत करतायेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला असून खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत.
सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचं ट्विट
A promise between us, the PTI Family. #IamImranKhan pic.twitter.com/uXiunO0Se2
— PTI (@PTIofficial) March 27, 2022
24 खासदार बंडखोर
इम्रान खान यांच्या सरकारवर देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला त्यांचं सरकार जबाबदरा असल्याचा आरोप केलाय. 24 खासदारांनी बंड केल्याने इम्रान सरकार अल्पमतात आहे. इस्लामाबादमधील रॅलीत सहभागी होण्यासाठी त्यांचे हजारो समर्थक परेड ग्राऊंडवर पोहोचले आहेत. खासगी माध्यमांना रॅलीतून हाकलून लावले आहे.तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या सरकारमधील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याची माहिती आहे.
खान यांच्यावर दबाव?
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात वातावरण तापलंय. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जनरल बाजवा इम्रान खान यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचं बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजवा यांनी इम्रान खान यांना राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.
परेड ग्राऊंडवर सभा
इस्लामाबादच्या परेड ग्राऊंडवर रात्री आठ वाजता इम्रान खान यांची सभा होणार आहे. या रॅलीत केवळ 40 हजार लोक पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने 10 लाख लोक आल्याचा दावा केला होता.
सभेत राजीनाम्याची शक्यता
इस्लामाबादच्या सभेत इम्रान खान राजीनामा देऊ शकतात. ते पुन्हा निवडणुकीची मागणी करू शकतात. या मेळाव्यात त्यांच्या पक्षाने सर्व खासदारांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी वाहिन्या इम्रान खान यांच्या रॅलीचे कव्हरेज करणार नसल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, इस्लामाबादमधील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इम्रान खानच्या परेड ग्राऊंडच्या रॅलीत केवळ 40 हजार लोक पोहोचले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाने 10 लाख लोक आल्याचा दावा केला होता.
इम्रान खान यांची सभा
Pakistan Prime Minister Imran Khan to address a rally in Islamabad shortly, as he battles to save his post in the wake of a no-confidence motion by the Opposition.
(File photo) pic.twitter.com/tx1amgPXNv
— ANI (@ANI) March 27, 2022
#WATCH Pakistan Prime Minister Imran Khan arrives in Islamabad to address a public gathering. pic.twitter.com/9B936WRIUJ
— ANI (@ANI) March 27, 2022
अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ
विश्वास ठराव मांडल्याशिवायच अधिवेशन तहकूब करण्यात आल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार विरोध केला.नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी सांगितले की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे खासदार खयाल जमान यांच्या निधनामुळे अधिवेशन 28 मार्चला दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संसदीय परंपरेनुसार खासदाराच्या मृत्यूनंतर केवळ मृत आत्म्यासाठी प्रार्थना केली जाते आणि सहकारी सदस्य सभागृहाच्या पहिल्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करतात. नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासह अनेक प्रभावशाली विरोधी खासदार बहुप्रतिक्षित अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी संसदेत उपस्थित होते. अधिवेशन तहकूब केल्याने विरोधकांनी गदारोळ केला.
इतर बातम्या
नव्या धमकीबद्दल धन्यवाद Sanjay Raut यांचं Chandrakant Patil यांना प्रत्युत्तर
RRR Movie Collection : ‘आरआरआर’चा बॉक्सऑफिसवर कल्ला, पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वजनदार गल्ला…
पापी लोकांच्या हातून लोकार्पण होण्याच्या आधीच आम्ही लोकार्पण केले : Sadabhau Khot यांचा घणाघात