इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
एमआयमचे खासदार इम्जियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत आज (26 जानेवारी) आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम राणा (attack On RTI Activist aurangabad) यांनी केला आहे.
औरंगाबाद : एमआयमचे खासदार इम्जियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत आज (26 जानेवारी) आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम राणा (attack On RTI Activist aurangabad) यांनी केला आहे. प्रजासत्ताकदिना निमित्त आज खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत जलील यांच्या कार्यकर्त्यांनी नदीम राणा (attack On RTI Activist aurangabad) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
नदीम राणा यांनी काहीदिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या रागातून हा हल्ला झाला असल्याचे राणा यांनी म्हटले. यावेळी जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद शहरात एक वेगळंच चित्रही पाहायला मिळालं. प्रजासत्ताकदिनाच्या एका कार्यक्रमात औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर दिसले. इतकंच नाही तर खैरेंनी जलील यांचा हात हातात घेऊन तो उंचावत भारत माता की जय अशी घोषणाही दिली.
एमआयएम आणि शिवसेनेचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण आज औरंगाबादचे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे एकमेकांच्या समोर आले. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचावर आले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांचा हात हातात घेऊन उंचावत, ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली. इम्तियाज जलील यांनाही घोषणा द्यायला लावली. त्यामुळे उपस्थित सर्वजण आवाक झाले.