मित्राच्या पार्टीत ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध; बेशुद्ध झाल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार

पेयात गुंगीचं औषध देऊन 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना अंधेरी येथे घडली आहे. विषेश म्हणजे मित्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्येच गुंगीचं औषध दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

मित्राच्या पार्टीत ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध; बेशुद्ध झाल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 5:07 PM

मुंबई : पेयात गुंगीचं औषध देऊन 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार सहार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मित्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्येच गुंगीचं औषध दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. (22 year old woman gangraped in Andheri in Andheri)

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 8 नोव्हेंबर 2020 रोजी तक्रारदार महिला आपल्या मित्रांसोबत एका पार्टीमध्ये गेली होती. ही पार्टी अंधेरी येथील तिच्या मित्राच्याच हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिच्या पेयात आरोपींनी गुंगीचे औषध मिसळले. तक्रारदार महिलेने ते मद्य पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची या आधीही भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, घटना अंधेरी परिसरात घडल्यामुळे ही तक्रार नंतर सहार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आतापर्यंत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सहार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा

(22 year old woman gangraped in Andheri in Andheri)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.