महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच नवा कायदा, अनिल देशमुख यांची घोषणा

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. हिवाळी अधिवेशनात या काद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच नवा कायदा, अनिल देशमुख यांची घोषणा
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:13 PM

जळगाव : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. हिवाळी अधिवेशनात या काद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. (In Maharashtra soon there will be new law for women safety said Anil Deshmukh)

अमळनेर येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख अमळनेर येथे आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात ‘दिशा’ कायदा करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायदा गालू केला जाईल असं ते म्हणाले. येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही देशमुख यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या फसवणूक रोखण्यासाठी नवा कायदा

“अलीकडच्या काळात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही खास धोरण आखणार आहोत. त्यासाठी नवा कायदा आणण्याचे प्रयत्न आहेत. येत्या अधिवेशनात हा कायदादेखील आकारास येईल”, असेही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली आहे. हे प्रशिक्षण केंद्र लवकरच पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. परंतु, प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे हलवले, अशी चुकीची माहिती विरोधकांनी पसरवली, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. तसेच वरणगाव येथील प्रशिक्षण केंद्र लवकरच पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासनही देशमुख यांनी दिले.

संबंधित बातम्या :

विधान परिषदेसाठी 12 जण ठरले, पवार-ठाकरेंकडे नावं गुप्त : अनिल देशमुख

“आघाडीपेक्षा ‘महाविकास आघाडी सरकार’ अधिक मजबूत” अनिल देशमुखांचा दावा, खडसेंसोबत नंदुरबार दौरा

अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

(In Maharashtra soon there will be new law for women safety said Anil Deshmukh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.