इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमधील नागरिक हैराण झाले आहेत. गरिबीला कंटाळून पट्टोकी येथील एका पित्यानेच आपल्या पाच मुलांना चक्क कालव्यात फेकल्याचा प्रकार घडला आहे. पट्टोकीमधील जांबेर येथील कालव्यात ही पाच मुलं फेकण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यातील तीन मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर इतर पाच मुलांचा शोध घेणे सुरु आहे. घरातील गरिबीला कंटाळल्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. (In Pakistan man threw up his five children in Canal)
बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. यातील एकाचे नाव अहमद आहे. तो एक वर्षांचा आहे. तर दुसरी मुलीचे नाव फिजा असून तिचाही मृतदेह सापडला आहे. बाकीच्या तीन मुलांचा शोध घेणे सुरु आहे. पोलिसांनी सांगिल्याप्रमाणे या मुलांचा पिता घरातील गरिबीला कंटाळला होता. पत्नीशी वाद झाल्याने, संतापाच्या भरात त्याने हे भयानक कृत्य केले. पोलिसांनी सांगितले, की फेकून दिलेल्या एकूण दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन वर्षांची ताशा, पाच वर्षीय जैन आणि सात वर्षीय नादिया यांचा शोध घेणे अजूनही सुरु आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तानमधील न्यूज वेबसाईट ‘इंटरनॅशनल द न्यूज’मध्ये आलेल्या बातमीनुसार जून 2020 पर्यंत पाकिस्तानवर तब्बल 44.5 ट्रिलियन एवढं कर्ज झालं आहे. हे कर्ज पाकिस्तानच्या एकूण जीडीपीच्या 106.8 टक्के एवढे आहे. तर एका रिपोर्टनुसार पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. 90 च्या दशकात जशी होती; तशी पातळी पाकिस्तानी अर्थव्यवस्थेने गाठली आहे.
दरम्यान,पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ज्या ‘देशांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे; त्या देशांवरील कर्जाचा बोजा कमी करावा’ अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेली आहे. पाकिस्तानवर असलेल्या कर्जात सूट देण्यात यावी, अशीदेखील विनंती इमरान खान यांनी केली होती. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात असल्यामुळे इनमरान खान इतर देशांकडून कर्ज घेऊन देशाचा कारभार चालवत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आयएमएफकडूनही कर्ज घेतलेले आहे.
VIDEO: 36 जिल्हे 72 बातम्या | 6:30 PM | 6 December 2020https://t.co/DhGVCDIeD8#TV9Marathi #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
संबंधित बातम्या :
Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश
काश्मीरमधील तरुणांना भडकावण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल, थेट तुर्कीतून नवं षडयंत्र होत असल्याचा आरोप