Pune | पुण्यात ‘जायका’ ला अखेर केंद्राचा हिरवा कंदील ; मुळा व मुठाच्या संवर्धनाला वेग येणार
2015 मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता.त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे 6 वर्षे रखडला होता. सुमारे 1500 कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर 11सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार
पुणे- शहरातील प्रदूषित नद्या(rivers) मुळा व मुठा याच्या संवर्धनासाठी व राबवण्यात येणाऱ्या सुधार योजनेच्या निविदांना मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने हिरवा कंदील दाखविला( central government) या सुधार योजनेच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेस येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय आणि जपानच्या जायका आणि पुणे महानगरपालिकेसोबत (Pune Municipal Corporation)करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या जवळपास1 हजार कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.या प्रकल्पात जवळपास 55 किलोमीटरच अंतर असणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. आहे.
आय वादामुळे अडकले होते काम
2015 मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता.त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे 6 वर्षे रखडला होता. सुमारे 1500 कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर 11 सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार असून त्या द्वारे शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण पूर्ण रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
प्रकल्प मार्गी लागला
महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. जायकाची मान्यता मिळाल्याने आता नदीसुधार आणि नदीकाठ विकसन प्रकल्प एकच वेळी सुरू होणार असून शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे. या प्रकल्प मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, राज्य, केंद्रशासनाच्या सर्व विभागाचे महापौर म्हणून मी आभार मानतो. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे असे मत महापौर मोहळ यांनी व्यक्त केले आहे.
Viral : ‘पापा की परी अंकल को ले उडी’, स्कूटर शिकणाऱ्या लाडलीनं काय केलं? पाहा Funny video