Ind vs Aus : काय सांगता! चेतेश्वर पुजाराला सिक्स मारला म्हणून मिळाले 1 लाख?, जाणून घ्या

तिसऱ्या कसोटीमध्ये चेतेश्वर पुजाराने सिक्स मारला म्हणून 1 लाख देण्यात आल्याचं क्रीडा वर्तुळात बोललं जात आहे.

Ind vs Aus : काय सांगता! चेतेश्वर पुजाराला सिक्स मारला म्हणून मिळाले 1 लाख?, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:49 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. भारताच्या खेळाडूंची फलंदाजी फ्लॉप ठरली. पहिल्या डावात भारताला 109 आणि दुसऱ्या डावात 163 धावाच करत आल्या. कांगारूंनी हा सामना 9 विकेट्सने आपल्या खिशात घालत मालिकेतील विजयाचं खातं उघडलं आहे. सामन्यामध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करत भारताला 150 धावांचा टप्पा पार करून देण्यात मोलाची भूमिका पार पडली होती. पुजाराने केलेल्या 59 धावांच्या खेळीमध्ये त्याने एक सिक्स मारला. या सिक्सची चर्चा होत आहे त्याचं कारण म्हणजे पुजाराला सिक्स मारला म्हणून 1 लाख देण्यात आल्याचं क्रीडा वर्तुळात बोललं जात आहे.

भाराताच्या दुसऱ्या डावात भारताचे इतर फलंदाज फक्त हजेरी लावून जात होते. मात्र चेतेश्वर पुजाराने खेळपट्टीवर तळ ठोकला होता. 142 चेंडू त्याने आणि 59 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि 1 सिक्स मारला. पुजारा मैदानात असताना त्याच्या पद्धतीने खेळत होता. मात्र इकडे ड्रेसिंग रूममधून बसलेला कर्णधार रोहित शर्माने वैतागलेला दिसला. काही वेळाने त्याने निरोप पाठवला की आक्रमक फटके खेळा आणि धावा काढा. निरोपानंतर पुजाराने एक गगनचुंबी षटकार मारला त्यावेळी ड्रेसिंग रूममधील खेळाडू हसताना दिसले.

राहिला प्रश्न पुजाराल खरच सिक्स मारला म्हणून 1 लाख देण्यात आले का? असं काही नसून पुजाराला ‘अंबुजा स्ट्राँगेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच’, या पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामन्यामध्ये पुजाराने सर्वात लांब सिक्स मारला होता म्हणून त्याला गौरवताना ट्रॉफी आणि एक लाख रुपये देण्यात आले.

दरम्यान, बॉर्डर गावसकर मालिकेमधील चार सामन्यांच्या मालिकेमध्ये कांगारूंनी 2-1 ने विजयाचं खात उघडलं आहे. भारताकडे सुरूवातीचे नागपूर आणि दिल्लीमधील सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र आता चौथ्या कसोटीमध्ये भारताला मालिका जिंकण्यासाठी विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरीकडे पाहुणा संघ ऑस्ट्रेलियाला मालिका गमवायची नसेल तर चौथा कसोटी सामना जिंकत बरोबरी साधता येणार आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.