Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या पृथ्वी शॉकडून टीकाकारांना सडेतोड उत्तर

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत फलंदाजीत सुमार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सध्या टीकेचा धनी बनला आहे.

IND vs AUS : खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या पृथ्वी शॉकडून टीकाकारांना सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:58 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Australia vs India 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात केवळ 36 धावा केल्या. पराभव आणि दुसऱ्या डावातील निच्चांकी धावसंख्या यावरुन टीम इंडियावर चांगलीच टीका करण्यात आली. पराभवामुळे टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यातील संघ निवडीवरुनही टीका केली गेली. टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यात नेटीझन्सकडून टीका सुरु आहे. आजी माजी खेळाडूंकडून भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे टीम इंडियाचं काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण झालं. त्यातही प्रामुख्याने पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) सर्वाधिक टीका केली जात आहे. (Prithvi Shaw being criticized the most)

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत फलंदाजीत सुमार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सध्या टीकेचा धनी बनला आहे. पृथ्वी शॉला ट्रोल करणारे मिम्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर अनेकजण पृथ्वीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करायला नको होती, असे म्हणत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होत असलेल्या पृथ्वी शॉने अखेर मौन सोडलं आहे. (IND vs AUS : Prithvi Shaw posts cryptic message in Instagram story after Adelaide Test)

पृथ्वी शॉने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीच्या माध्यमातून एक सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीने त्याच्या इन्स्टा स्टोरीत म्हटलं आहे की, “तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जर इतर लोकं तुम्हाला नाउमेद करत असतील तर याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट करु शकता आणि इतर लोक नाही.” दरम्यान, पहिल्या कसोटीतील फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातील सुमार कामगिरीनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागेवर सलामीसाठी शुभमन गिल याला संधी मिळू शकते.

मोबाईल बंद ठेवा, बाहेरील चर्चांकडे दुर्लक्ष करा, मोहम्मद कैफचा टीम इंडियाला सल्ला

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारूण पराभवामुळे टीम इंडियाचं मानसिक खच्चीकरण झालं. अशात टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) संघातील सर्व खेळाडूंना महत्वाचा सल्ला दिला आहे. त्याने एक ट्विट केलं आहे, त्यात त्याने म्हटलं आहे की, “फोन बंद करा. बाहेर होणाऱ्या चर्चेकडे दुर्लक्ष करा. एक टीम म्हणून एकत्र रहा आणि पुढे पाहा. टीम इंडियाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठीचा हा एकमेव पर्याय आहे.”

दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल

भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी मोठे बदल केले जाणार आहेत. टीममध्ये एकूण 4 बदल केले जाऊ शकतात. यामध्ये पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल, रिद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंत, हनुमा विहारीऐवजी रवींद्र जाडेजाला, तसेच दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. ही मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एकमेव खेळाडूला मॅन ऑफ द मॅच म्हणून खास मेडल देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India 2nd Test | ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला मिळणार खास मेडल

Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, ‘या’ विषयावर चर्चा

(IND vs AUS : Prithvi Shaw posts cryptic message in Instagram story after Adelaide Test)

देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.