कोरोनाचे निदान 30 मिनिटात, भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन सुरु, फोनवर आवाज ऐकूनही तपासणी

भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रितपणे चार नवीन पद्धतीचा शोध घेत (India and Israel research on corona test) आहेत

कोरोनाचे निदान 30 मिनिटात, भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन सुरु, फोनवर आवाज ऐकूनही तपासणी
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 9:03 AM

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रितपणे चार नवीन पद्धतीचा शोध घेत (India and Israel research on corona test) आहेत, ज्यामुळे कोरोनाचे निदान काही मिनिटात होऊ शकणार आहे. यासाठीच इस्रायलच्या वैज्ञानिकांचे एक पथक या आठवड्यात भारतात येणार (India and Israel research on corona test) आहेत.

भारत आणि इस्रायल मिळून ज्या चार पद्धतींचा अभ्यास करत आहेत. जर त्या यशस्वी झाल्या तर एक मोठं यश भारताला मिळू शकते.

भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक जो शोध लावणार आहे. त्यामध्ये एकूण चार पद्धतींवर वैज्ञानिक अभ्यास करणार आहेत. यातील दोन कोरोना तपासणी आहेत. ज्यामध्ये काही मिनिटात कोरोनाचे निदान होऊ शकते. तर तिसरी पद्धत ही सर्वात वेगळी आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा आवाज ऐकून कोरोनाचे निदान केले जाणार आहे. तसेच चौथ्या पद्धतीत आपल्या श्वासातील सॅम्पल घेऊन रेडिओ वेव्हने कोरोनाचे निदान केले जाईल.

“इस्रायलचे वैज्ञानिक राजधानी दिल्लीच्या AIIMS येथे रिसर्च करणार आहेत. या पद्धतीने तपासणी करण्याची पहिली पद्धत इस्रायलमध्ये करण्यात आली आहे. आता शेवटची पद्धत भारतात केली जाणार आहे”, असं भारतातील इस्रायलचे राजदून रॉन मलकिन यांनी सांगितले.

30 मिनिटात कोरोनाचे निदान होणार

“कोरोना तपासणीच्या पहिल्या पद्धतीत पॉलीमिनो अॅसिडचा वापर केला आहे. ज्यामुळे केवळ 30 मिनिटात निदान होणार आहे. हे जर यशस्वी झाले तर एअरपोर्ट, मॉल कुठेही तुम्ही गेला तर तपासणी करुन तुम्हाला तेथे प्रवेश दिला जाऊ शकतो”, असं इस्रायलचे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी दानी गोल्ड यांनी सांगितले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“तर दुसऱ्या पद्धतीत एक स्वस्त बायोकेमिकल तपासणी आहे. ही घरी सुद्धा केली जाऊ शकते. या पद्धतीतही 30 मिनिटात तुम्हाला कोरोनाचे निदान होणार आहे”, असंही दानी गोल्ड यांनी सांगितले.

फोनवर आवाज ऐकूनही कोरोनाचे निदान होणार

“तिसऱ्या पद्धतीत टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (AI) चा वापर करुन एखाद्या व्यक्तीचा फोनवर आवाज एकून कोरोना आहे की नाही याचे निदान केले जाऊ शकते”, असं दानी गोल्ड म्हणाले.

“तिसरी पद्धत ब्रेथ अॅनालायझर आहे. यामध्ये एक व्यक्ती ट्यूबमध्ये श्वास घेणार. त्यानंतर आम्ही ती ट्यूब एका मशीनमध्ये टाकणार, ज्यामध्ये टेराहर्टज रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि एक अॅल्गोरिथ्मचा वापर करुन कोरोनाची लागण आहे का नाही हे तपासू शकतो”, असं दानी गोल्ड यांनी सांगितले.

या प्रोजेक्सटचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन आणि इस्रायलचे वैज्ञानिक दानी गोल्ड करत आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

Corona in India | देशातील कोरोनाग्रस्त दहा लाखांच्या पार, मात्र ‘या’ बाबतीत भारत 106 व्या क्रमांकावर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.