India China Conflict | चीनचा दुतोंडीपणा, पँगाँग, शिनजियांग भागात चिनी सैन्य तैनात

एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा, या पारंपरिक कारस्थानात चीनने तसूभरही बदल केलेला (India-China Border Conflict Issue) नाही.

India China Conflict | चीनचा दुतोंडीपणा, पँगाँग, शिनजियांग भागात चिनी सैन्य तैनात
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 12:07 AM

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून तापलेला भारत-चीन वाद मागच्या आठवड्याभरापासून (India-China Border Conflict Issue) थंडावल्याचं चित्र होतं. कारण, एक-दोन ठिकाणं सोडली तर इतर ठिकाणाहून चीनी सैन्य मागे परतलं होतं. मात्र चीनचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. 15 जूनला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चीनला तोंडावर पडला. पण तरीसुद्धा चीनला भरलेला युद्धाचा ज्वर उतरेलला नाही.

ज्या ठिकाणी भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावलं, त्याच ठिकाणापासून 3 किलोमीटर लांबवरील सॅटेलाईट फोटो हाती लागले आहेत. ज्या फोटोवरुन पुन्हा एकदा चीनच्या दुतोंडीपणावर शिक्का बसला आहे. पँगाँगच्या भागात चिनी सैन्य अजूनही तैनात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिंगर 4 पासून 3 किलोमीटर लांबवर चीन हालचाली करत आहे. इतकंच नाही तर तिथून काही किलोमीटरमागे चिनी सैन्याचे कँम्पसुद्धा दिसले आहेत. त्यामुळे एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा, या पारंपरिक कारस्थानात चीननं तसूभरही बदल केलेला (India-China Border Conflict Issue) नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दुसरीकडे शिनजियांग प्रांतातल्या एअरबेसवर चीन स्वतःचं स्थान भक्कम करत आहे. शिनजियांग भागातला चीनचा एअरबेस हा लेहपासून 382 किलोमीटर लांब आहे. तिथं चिनी वायुदलाची लढाऊ विमानं, एअरक्राफ्ट आणि डिफेन्स युनिट्स तैनात झाली आहेत. तैनात करण्यात आलेल्या विमानांमध्ये जे-8 आणि शेनयांग फाल्कर सारख्या विमानांचा समावेश आहे.

जे-8 हे विमान चीननं रशियाची डिझाईन चोरी करुन विकसित केलं आहे. वेगात तज्ज्ञ असलेलं हे विमान काही सेंकदातच काहीशे किलोमीटर उंच उडण्याच्या क्षमतेचं आहे.

हिमालयात भौगोलिक रचनेमुळे भारतीय सैन्याची ताकद चीनपेक्षा उजवीच आहे. गलवानमधून घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे चीनची झोप उडाली आहे. मात्र तैवान, जपानसारख्या देशांना धाकात ठेवण्यासाठी लडाखमधली स्थिती आमच्याच हातात असल्याचं चीन भासवू (India-China Border Conflict Issue) पाहतोय.

दुसरी गोष्ट म्हणजे जर लडाखमधून चीन एकाच दमात सर्व जागांवरुन मागे हटला, तर दक्षिण चिनी समुद्रात लढणाऱ्या चिनी नेव्हीचं मनोबल खचण्याचीही चीनला भीती आहे.

भारत मात्र अजूनही सतर्क आहे. ज्या गलवानमध्ये बंदुकधारी सैनिक सुद्धा क्वचित दिसायचे. तिथं आता चीनच्या दिशेनं तौफा तैनात आहेत. आतासुद्धा 60 हजार भारतीय जवान सीमेवर पहारा देत आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

एकीकडे जमिनीवर जवानांचा पहार आहे. तर दुसरीकडे भारतीय वायूदल आकाशातून चीनच्या चालबाजीवर नजर ठेवतं आहे. भीष्म टँक, अपाचे हेलिकॉप्टर, सुखोई, शिनूक आणि रुद्र हेलिकॉप्टर दुसऱ्या सेकंदाला हल्ला करु शकेल, या स्थितीत सज्ज आहेत.

मंगळवारी 14 जुलैला चुशुलमध्ये तब्बल 15 तास कमांडर पातळीवरची चर्चा झाली. या चर्चेत गलवान, हॉटस्प्रिंग आणि गोगरा या ठिकाणाहून मागे जाण्यास चीन तयार झाला होता. मात्र चिनी सैन्य अजूनही पॅगाँग आणि देपसांग या भागात भारतीय सैन्यापासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. त्यामुळे चीनसोबतचा वाद निवळण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त (India-China Border Conflict Issue) आहे.

संबंधित बातम्या : 

चीनविरोधात 9 देशांची एकजूट, अमेरिकेची आक्रमकता, युद्धाचे संकेत?

जगातील सर्वात मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता, चीनच्या अनेक राज्यांत महापूर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.